सोन्याच्या भावात रेकॉर्डब्रेक वाढ !

एमसीएक्सवर सोने निर्देशांकात ०.९० टक्क्याने वाढ

    28-Mar-2024
Total Views |

Gold
 
मुंबई: आज सराफाबाजारात सोनाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. देशातील सर्वच शहरातील प्रति ग्रॅम किंमत वाढली आहे. देशातील सरासरी दराप्रमाणे २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅममागे ३५ रुपयांनी भाववाढ झाली आहे. तर १० ग्रॅम सोने किंमत ३५० रुपयांनी वाढल्याने सोन्याचा किंमती गगनाला भिडल्या आहेत.
 
देशातील २४ कॅरेट सोन्याच्या भावात सरासरी प्रति ग्रॅम ३८ रुपयांनी दर वाढले आहेत. तर १० ग्रॅम सोने किंमत प्रति ग्रॅम ३८० रूपयांनी वाढली आहे. १८ ग्रॅम सोनाच्या भावात देखील आज वाढ झाली आहे. १८ ग्रॅम सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम किंमत २९ रूपयांनी वाढली आहे तर १० ग्रॅम सोने किंमत २९० रुपयांनी वाढलेली आहे.
 
मुंबईतदेखील सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.२२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम किंमत ३५ रूपयांनी वाढली आहे तर १० ग्रॅमची किंमत ३५० रूपयांनी वाढली आहे.
 
२४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम किंमत २९ रुपयाने वाढली आहे.त्यातील १० ग्रॅम सोनाच्या किमतीत २९० रुपयांनी वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत २२ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम १२ रुपयांनी तर २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम १६ ते १८ रुपयांनी वाढ झाली आहे.
 
मुंबईत २२ कॅरेटला प्रति ग्रॅम सोन्याचे दर ६१७० रुपये व २४ कॅरेटला प्रति ग्रॅम दर ६७३१ रुपये आहेत.१८ कॅरेट सोन्याचे भाव प्रति ग्रॅम ५०४८ रुपये इतका आहे.
 
MCX वर भाव वाढला
 
मल्टि कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये सोनाच्या निर्देशांकात मोठी उसळण झाली आहे. आज सोनाच्या निर्देशांकात वाढ होत ६६९६३ किंमतीवर पोहोचले असून तब्बल ०.९० टक्क्याने सोने निर्देशांकात वाढ झाली आहे तर चांदी निर्देशांक ०.०९ टक्क्याने वाढत ,७४७३० पातळीवर पोहोचले आहे.