उझमा बनली मीरा! अनिलसोबत लग्नासाठी केली घरवापसी

    28-Mar-2024
Total Views |
 GharWapasi
 
 
नवी दिल्ली : एका मुस्लिम मुलीने सनातन धर्मात घरवापसी केली आहे. घरवापसी केलेल्या मुलीचे नाव उझमा असून ती आता मीरा म्हणून ओळखली जाणार आहे. मंगळवारी, दि. २६ मार्च २०२४ आर्य समाज मंदिरात मीराचा अनिल नावाच्या तरुणाशी हिंदू धार्मिक विधीनुसार विवाह झाला. हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या विवाह आणि घरवापसीमध्ये या जोडप्याचे सहकार्य केले आणि नवविवाहित जोडप्याला सन्मान आणि सुरक्षा देण्याचे वचनही दिले.
 
उझमा ही मूळची उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यातील आहे. तिच्या वडिलांचे नाव जनाब अहमद खान आहे. तर तिचा पती अनिल हा दिल्लीतील टागोर गार्डन परिसरात राहणारा आहे. उझमाने स्वत:ला प्रौढ असल्याचे सांगितले आणि सांगितले की अनिलशी लग्न करून तिने समातन धर्मात घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. हा तिचा स्वतःचा निर्णय होता आणि कोणीही तिला तसे करण्यास भाग पाडले नाही. त्याचवेळी अनिलने प्रौढ झाल्याचे प्रमाणपत्रही दिले. दिल्लीच्या सनातन वैदिक सामाजिक कल्याण संस्थेच्या माध्यमातून दोघांचा विवाह पार पडला.
 
 
दोघांच्या लग्नात वैदिक मंत्रांचा जप करण्यात आला. विधीनुसार उझमाने मीराच्या रूपात हवन पूजा केली. या जोडप्याने अग्नीला साक्षी मानून ७ फेऱ्या घेतल्या आणि नेहमी एकमेकांना समर्पित राहण्याची शपथ घेतली. यावेळी उपस्थितांनी वधू-वरांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उझमा तिच्या लग्नामुळे खूप खूश आहे. लग्नानंतर ती पतीसोबत गेली.
 
उझमाची ६ वर्षांपूर्वी अनिल वाल्मिकी यांच्याशी ओळख झाली. मैत्रीच्या काही दिवसातच दोघेही एकमेकांना पसंत करू लागले. शेवटी, भिन्न धर्माचे असूनही, उझमा आणि अनिल यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अनिलने घरच्यांना या नात्यासाठी पटवले, पण उझमाचे कुटुंब तयार नव्हते. अखेर उझमाने दि. २६ मार्च २०२४ रोजी उझमाने घरच्यांचा विरोध पत्कारून अनिलशी लग्न केले.