दिल्ली मद्य घोटाळा : केजरीवालांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ!

    28-Mar-2024
Total Views |
Delhi Liquor Scam Kejriwal


नवी दिल्ली : 
   दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडी कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने केजरीवालांच्या ईडी कोठडीत वाढ केली असून विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी त्यांच्या कोठडीची मुदत वाढवण्याचा आदेश दिला आहे. सक्तवसुली संचालनालय(ईडी)कडून केजरीवालांच्या कोठडीत ७ दिवसांची वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना दि. २१ मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली. अटकेनंतर केजरीवालांनी दाखल केलेली जामीन अर्ज याचिका फेटाळण्यात आली. ईडीकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. आता केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ करत मुख्यमंत्री कायद्याहून मोठे नाहीत, असे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी कोर्टात म्हटले आहे.


हे वाचलंत का? - मोदींना 'अँटी मुस्लिम' म्हणणं हा २१व्या शतकातील मोठा विनोद!


अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी केजरीवालांच्या आरोपांवर प्रतिवाद करताना म्हटले आहे की, दिल्ली मद्य धोरणाशी भाजपचा काही संबंध नसून भाजपकडे पैसा येत असल्याचा दावा अरविंद केजरीवाल करत आहेत, पण त्याचा दारू धोरणाशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी कोर्टात सांगितले आहे.

राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने दिलेल्या सुनावणीनुसार आता दिल्लीचे मुख्यमंत्री दि. ०१ एप्रिल २०२४ पर्यंत ईडीच्या कोठडीत राहतील. त्याच्यावर दारू घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा खटला सुरू आहे. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी त्यांच्या कोठडीची मुदत वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे. दिल्ली मद्य घोटाळ्यात मनी लाँड्रिंगचा खटला सुरू आहे.