मोठी बातमी: एनसीलटीचा बायजूज रविंद्रन यांना दिलासा! गुंतवणूकदारांची बैठक रद्द करण्याची मागणी फेटाळली

अनन्यसाधारण बैठक ठरल्याप्रमाणे होणार हे निश्चित

    28-Mar-2024
Total Views |

Byju
 
मुंबई: नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल (NCLT) ने बायजूजच्या अनन्यसाधारण साधारण बैठकीवर बंदी घालण्यास मनाई केली आहे. बायजूज प्रकरणात कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) व मुख्य कार्यकारी अधिकारी बैजूज रवींद्रन व त्यांच्या कुटुंबीयांविरूद्ध कंपनीच्या नियंत्रणावरून कलगीतुरा रंगला होता. बायजूज कंपनीच्या समभाग भांडवलात वाढ करण्यासाठी ही बैठक बोलावली होती. त्याविरोधात कंपनीच्या गुंतवणूक भागभांडवलाधारकांनी एनसीलटीकडे धाव घेतली होती मात्र यावर स्थगिती देण्यास प्राधिकरणाने मनाई केली आहे.
 
बायजूजचे भागभांडवलधारक प्रोसस (Prosus) ने बायजूजच्या व्यवस्थापनाबाबत एनसीलटीकडे धाव घेतली होती.एनसीएलटीने बैठक रोखण्यास मनाई केली असली तरी बायजूजला आपल्या सर्व संबधित राईट इश्यूबाबत (Right Issue ) गुंतवणूकदारांची, कंपनीची व कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची माहिती समोर आणण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी जोपर्यंत हे प्रकरण संपत नाही तोपर्यंत कंपनीला एनसीलटीने संभाव्य वाढवण्यासाठी असलेला निधी वेगळा काढन ठेवण्यास सांगितले होते.
 
ही बैठक उद्या २९ मार्चला होणार होती.एनसीलटीचा निकालानंतर बायजूजला निधी वाढवण्यासाठी असलेल्या बैठकीचा मार्ग खुला झाला आहे. बायजूजला आपल्या अधिकृत भांडवलात वाढ करायची असल्याने कंपनीने राईट इश्यू आणायचे ठरवले होते.फिर्याद करणारी गुंतवणूकदारांची समितीने आपल्याला अंधारात ठेवून हे भागभांडवल वाढवायचे निर्णय घेत असल्याचे सांगितले.आपल्याला यातील कुठलीही कल्पना नसल्याचे त्यांनी एनसीलटीकडे स्पष्ट केले. यावर प्रतिदावे करत कंपनीने न बोलावलेल्या गुंतवणूकदारांचे इ मेल अँडरेस नसल्याचे एनसीलटीकडे सांगितले.
 
एनसीलटीने सगळ्या गुंतवणूकदारांना या बैठकीची कल्पना नसल्यास ही अधिकृत नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सगळ्या घटकांना निमंत्रण देणे हे बायजूजपुढील प्रमुख लक्ष असणार आहे. बायजूज कंपनीला राईट इश्यूबाबत पुढील ९० दिवसांत ठोस पाऊल उचलावे लागणार असल्याचे कळते आहे.एप्रिल ६ पर्यंत अनन्यसाधारण बैठक घेण्याबाबत कंपनीच्या सदस्यांना मुदत देण्यात आली आहे.