अशोका विद्यापीठात ब्राह्मण विरोधी घोषणा!

जातीयवादाला खतपाणी घालणारं आंदोलन

    28-Mar-2024
Total Views |

Ashoka University

चंदीगढ : हरियाणाच्या सोनीपत येथील अशोका विद्यापीठ (Ashoka University Controversy) पुन्हा एकदा वादाला कारण ठरले आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘ब्राह्मण-बनियावाद मुर्दाबाद’ या हिंदुफोबिक घोषणांचे व्हीडिओ समाजमाध्यमांवर चांगलेच व्हायरल झाले. त्यामुळे ऑनलाइन संताप पसरला असून नेटकऱ्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. ब्राह्मण आणि बनिया समुदायांना शिवीगाळ करण्याबरोबरच त्यांनी 'जय भीम-जय मीम' आणि 'जय सावित्री-जय फातिमा' अशा घोषणा देत जात जनगणना आणि आरक्षणाची मागणी केल्याचेही दिसते आहे.

हे वाचलंत का? : अंबाजोगाईजवळ पुरातत्व विभागाने लावला महत्त्वपूर्ण शोध!
सोशल मीडियावर ब्राह्मणविरोधी आणि जातीयवादी टिप्पणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे फुटेज समोर आल्यानंतर विद्यापीठाने २७ मार्च रोजी शांतता आणि एकात्मता वाढवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचा दावा करत एक निवेदन प्रसिद्ध केले आणि दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

अशोका विद्यापीठाला वादांचा इतिहास
जानेवारी २०२१ मध्ये, अशोका विद्यापीठातील नीलंजन सरकार नावाच्या एका प्राध्यापकाने भाजपवर टीका करण्याच्या बहाण्याने प्रभू श्रीरामाची थट्टा केली होती. ऑगस्ट २०२३ मध्ये, अशोका विद्यापीठाला एका निकृष्ट शोधनिबंधामुळे टीकेचा सामना करावा लागला ज्याने निवडणुकीतील हेराफेरीबद्दल संशयास्पद दावे केले होते. विशेष म्हणजे, विद्यापीठाने शोधनिबंधापासून स्वतःला दूर ठेवले असताना, काँग्रेस नेते शशी थरूर आणि डाव्या विचारसरणीच्या प्रचारकांनी ते वाढवले होते.