अंबाजोगाईजवळ पुरातत्व विभागाने लावला महत्त्वपूर्ण शोध!

28 Mar 2024 15:03:55

Ambajogai

छत्रपती संभाजीनगर
: बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईजवळील (Ambajogai) सकलेश्वर मंदिर परिसरात सुरू असलेल्या उत्खननादरम्यान महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्व विभागाने एक महत्त्वपूर्ण शोध लावल्याचे समोर येत आहे. उत्खननादरम्यान दोन मंदिरांचा पाया सापडल्याची पुष्टी पुरातत्व विभागाकडून करण्यात आली आहे. सापडलेल्या शिलालेखानुसार १२२८ मधील यादव घराण्याने यांचे बांधकाम केले असल्याची माहिती राज्य पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे यांनी दिली.


Ambajogai

मिळालेल्या माहितीनुसार, सकलेश्वर मंदिराच्या आवारात १५ मार्चपासून उत्खनन सुरू झाले होते. प्रत्येकी १०० चौरस फुटांचे १४ खंदक तयार करण्यात आले आहेत. यावेळी काही प्राचीन विटाही मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. उत्खननात हात आणि पाय असे शिल्पाचे काही भाग समोर आले आहेत. या प्रकल्पांतर्गत अंबाजोगाईतील प्राचीन वास्तूंचेही सर्वेक्षण करण्यात येणार असून, या परिसराला हेरिटेज गावाचा दर्जा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

Powered By Sangraha 9.0