'ईडीने बंगालमध्ये ३००० कोटी जप्त केले आहेत, सर्व पैसे गरिबांना द्यायचे आहेत'

27 Mar 2024 16:18:42
rajmata-amrita-roy-ahead-lok-sabha-election



नवी दिल्ली :    आगामी लोकसभा निवडणुकीकरिता राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. आता पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या गडाला सुरूंग लावण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमधील कृष्णनगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अमृता रॉय यांच्याशी पंतप्रधान मोदींनी फोनवरून निवडणूक प्रचाराविषयी माहिती घेतली आहे. या बातचीत दरम्यान भाजपच्या उमेदवार राजमाता यांनी सर्वप्रथम पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. यावेळी अमृता रॉय म्हणाल्या, तृणमूल काँग्रेसचे लोक त्यांच्या विरोधात खोटा प्रचार करत आहेत.


हे वाचलंत का? - दिल्ली मद्य घोटाळ्यातील पैसा गेला कुठे?, केजरीवाल 28 मार्चला कोर्टात सांगणार!


महाराजा कृष्णचंद्र यांच्या कुटुंबाला 'देशद्रोही' म्हणून दाखवण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून केला जात आहे. दरम्यान, त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांना समजावून सांगितले की, हे सर्व व्होट बँकेचे राजकारण आहे, अन्यथा बंगालमध्ये कृष्णचंद्रांनी केलेली उल्लेखनीय विकासकामे आपल्याला लहानपणीच शिकवली आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.



पंतप्रधान अमृता रॉय यांना म्हणाले, जोपर्यंत निवडणुका आहेत, तोपर्यंत विरोधक असे बिनबुडाचे आरोप करतील, कारण त्यांना त्यांची सध्याची पापे लपवायची आहेत, असे सांगतानाच अशा परिस्थितीकडे इतके लक्ष देण्याची गरज नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. “आज जे कृष्णचंद्रांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. एवढा जुना मुद्दा का काढायचा? त्यांच्या दुटप्पीपणाचा दबाव तुम्ही घेऊ नका. तुम्ही बंगालचे उज्ज्वल भविष्य आहात, बंगालचा वारसा जतन करण्याचे आव्हान तुमच्यासमोर आहे.



 
Powered By Sangraha 9.0