“एका सावरकरभक्तासाठी...” मुग्धा वैशंपायनची ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाबद्दल खास पोस्ट

    27-Mar-2024
Total Views |
गायिका मुग्धा वैशंपायन ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चरित्रपट पाहुन भारावून गेली आणि तिने रणदीप हुड्डाचे पोस्ट करत आभार मानले.
 

mugdha 
 
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट सध्या प्रत्येक भारतीयांची मने जिंकत आहे. रणदीप हुड्डा याचे दिग्दर्शन आणि अभिनय असलेल्या सावरकरांच्या (Swatantryaveer Savarkar) जीवनावरील हा चरित्रपट सामान्य प्रेक्षकांसह कलाकार देखील पाहात आहेत आणि अधिकाधिक लोकांपर्यंत तो पोहोचावा यासाठी सोशल मिडियावरुन पोस्ट करत त्याबद्दल सांगत आहेत. गायिका मुग्दा वैशंपायन हिने देखील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) हा चित्रपट पाहिला असून एक पोस्ट करत, स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट एका सावरकभक्तासाठी आनंदाचा क्षण आहे, असे तिने म्हटले आहे.
 
काय आहे मुग्धा वैशंपायन हिची पोस्ट?
 
">मुग्धाने लिहिले आहे की, “हा चित्रपट बघितला. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या तेजस्वी सूर्याचं आयुष्य अवघ्या जगाला कळावं, त्यांनी आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाने आपल्या मातृभूमीसाठी केलेला त्याग, त्यांच्यावर झालेला परकोटीचा अन्याय, त्यांचं देशकार्य संपूर्ण जगाला कळावं अशी गेले अनेक वर्ष खूप कळकळीची, तळमळीची इच्छा होती. आज या चित्रपटाच्या रुपाने सावरकर आणि त्यांचं “खरं” कार्य, त्यांच्यावर झालेला अन्याय, हे सगळं संपूर्ण जगभरात अधिकाधिक पोहोचतंय याचा किती आनंद, अभिमान, समाधान वाटतंय काय सांगू! एका सावरकरभक्तासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे”.
 

mugdha 
 
दरम्यान, या पुर्वी अजय पुरकर, सुप्रिया पिळगांवकर, सलील कुलकर्णी यांनी देखील चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या होत्या. २२ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाने आत्तापर्यंत बॉक्स ऑफिसवर १० कोटींचा पल्ला पार केला आहे.