‘विजयीभव:’ कंगनाच्या समर्थनार्थ मराठी अभिनेत्रीची खास पोस्ट चर्चेत

    27-Mar-2024
Total Views |
कंगना रणावतला लोकसभा निवडणूकीचे तिकीट मिळाल्यानंतर मराठी अभिनेत्रीकडून तिच्या समर्थनार्थ पोस्ट करण्यात आली आहे.
 

kangana ranaut 
 
मुंबई : देशात लोकसभा निवडणूकीचं बिगुल वाजलं आहे. अभिनेत्री कंगना रणावत (Kangana Ranaut) हिला भाजपने हिमाचल प्रदेशमधून लोकसभेचं तिकिट दिलं आहे. मनोरजंन क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत असणार आणि आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाणारी कंगना (Kangana Ranaut) आता राजकारणातही सक्रिय होणार आहे. दरम्यान, तिला तिकीट मिळाल्यानंतर बऱ्याच स्तरांतील मान्यवरांकडून तिचे अभिनंदन केले जात आहे. यात एका मराठी अभिनेत्रीचा देखील सहभाग आहे. तिने कंगनाच्या समर्थनार्थ पोस्ट करत तिचे अभिनंदन केले आहे.
 
बिग बॉस मराठी मधून प्रेक्षकांच्या घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री मेघा धाडे हिने काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता तिने कंगनाचे अभिनंदन करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. विजयीभव: असे म्हणत मेघाने कंगनाच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे.
 

kangana ranaut 
 
उमेदवारी मिळाल्यानंतर कंगनाची प्रतिक्रिया
 
कंगनाला पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरल्यानंतर मतदारांचा प्रतिसाद कसा असेल? असे विचारले असता ती म्हणाली, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामांवर आणि त्यांच्याच कर्मावर मी लोकांची पसंती मिळवेन किंबहुना निवडून देखील येईल”, असा विश्वास देखील यावेळी कंगनाने व्यक्त केला. पुढे ती कंगना असं देखील म्हणाली की, “मी वाटत नाही माझ्या नावाने, कामाने निवडून येईल आणि जिंकेल. पण पंतप्रधान मोदींच्या चांगल्या कर्माने, त्यांच्या परिश्रमाने, त्यांच्या नावाने निवडणूक जिंकेन, असेही ती म्हणाली.