गिरिजा ओक 'ठकीशी संवाद' नाटकातून पुन्हा रंगभूमीवर परतणार

    27-Mar-2024
Total Views |
'ठकीशी संवाद’ या नाटकात गिरीजा ओक सोबत सुव्रत जोशी झळकणार आहे.
 

girija oak 
 
मुंबई : ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या 'ठकीशी संवाद' या पुस्तकाचे आता नाटकात रुपांतर होणार आहे. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री गिरीजा ओक (Girija Oak) हिने तिच्या ‘ठकीशी संवाद’ नव्या नाटकाची घोषणा केली आहे. गिरीजा मराठीसह हिंदीतही (Girija Oak) आपल्या अभिनयाची छाप उमटवत आहे. नुकतीच गिरीजा 'जवान' आणि 'द वॅक्सिन वॉर' या चित्रपटांत देखील झळकली होती.
 

girija  
 
ठकीशी संवाद या नाटकात गिरीजा ओक सोबत अभिनेता सुव्रत जोशी दिसणार आहे. गिरीजाने या नाटकाबद्दलची एक पोस्ट सोशल मिडियावर केली आहे. 'ठकीशी संवाद' या नाटकाचा शुभारंभ १० मे रोजी होणार आहे. सतीश आळेकर लिखित अनुपम बर्वे दिग्दर्शित 'ठकीशी संवाद' हे नाटक नेमकं काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.