"ठाकरे-पवारांना 'वंचित'चा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी करायचा होता"

प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीवर घणाघात

    27-Mar-2024
Total Views |
 prakash ambedkar
 
मुंबई : वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा करताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या घराणेशाहीवर टीका केली ते म्हणाले की, "ठाकरे-पवारांना 'वंचित'चा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी करायचा होता, त्यांची घराणेशाही वाचवण्यास आम्ही नकार दिला आहे"
 
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील फॅक्टरला दुर्लक्षित करुन चालणार नाही. आम्ही त्यांना जरांगेंना सोबत घेण्यास सांगितले होते. पण महाविकास आघाडीने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले.
 
 
प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे आणि ओबीसी महासंघाचा पाठिंबा मिळाल्याचा सुद्धा दावा केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "मी काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आम्ही त्यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात उमेदवार देणार आहोत. याबात ३० मार्चला घोषणा केली जाईल."
 
महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला पाच जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला आठ जागांसाठी मतदान होणार आहे. याशिवाय तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी ११ जागांवर तर चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी ११ जागांवर मतदान होणार आहे. तसेच, पाचव्या टप्प्यात २० मे रोजी १३ जागांवर मतदान होणार आहे.