झी कंपनीच्या अंतर्गत समितीचा अहवाल सादर "हा' निष्कर्ष समोर

२० टक्क्याने EBITDA वाढवण्यासाठी गोयंका यांचे लक्ष

    27-Mar-2024
Total Views |

zee
 
मुंबई: झी एंटरटेनमेंटमधील वादग्रस्त ठरलेल्या झी सोनी विलीनीकरणाची शक्यता संपल्यानंतर झीने कंपनीअंतर्गत रिस्ट्रक्चरिंग
(फेरबदल) करण्यासाठी समिति नेमली होती. त्या समितीने आपले निष्कर्ष ठेवले आहेत. त्यात म्हटल्याप्रमाणे झी कंपनीने नफा कमावण्यासाठी कंपनीत फेरबदल करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
 
इंग्रजी वाहिनीवरील झालेले नुकसान कंपनीच्या इतर माध्यमातून भरून काढण्यासाठी कंपनीने पुढाकार घ्यावा व कंपनीतील अतिरिक्त खर्च कमी करून नफा वाढवण्यासाठी कंपनीने प्रयत्न केले पाहिजेत असा निष्कर्ष कंपनी वरील नेमलेल्या समितीने ठेवला आहे. झी सोनी विलीनीकरण प्रस्ताव रद्द झाल्यानंतर १० अब्ज डॉलरचे नुकसान कंपनीला सहन करावे लागले होते. झी कंपनीने म्हटल्याप्रमाणे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनित गोयंका यांनी कंपनीसाठी २० टक्के EBITDA (करपूर्व नफा) २० टक्क्यांचे लक्ष ठेवले असल्याचे म्हटले आहे.
 
आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये कंपनीच्या महसुलात नुकसान झाले होते. कंपनीचा महसूल ६०० दशलक्ष डॉलर्सवरुन घसरत ४८८ डॉलर्सपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे कंपनीच्यावतीने नफा वाढवण्यासाठी अनेक फेरबदल केले जाऊ शकतात.