शेअर बाजार अपडेट: सेन्सेक्स निफ्टी जबरदस्त उसळला

सेन्सेक्स ४८८ अंकाने निफ्टी ५० निर्देशांक १४१.६५ अंकाने उसळला

    27-Mar-2024
Total Views |

Stock Market
 
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकारात्मकता पहायला मिळाली आहे. गुंतवणूकदारांमध्ये जोश कायम दिसत आज सेन्सेक्स निफ्टीने नवी पातळी ओलांडली आहे. सेन्सेक्स तब्बल ४८८ अंकाने वाढून ७२९५४.२१ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० निर्देशांक १४१.६५ अंकाने उसळून २२१४६.३५ पातळीवर पोहोचला आहे. आज बँक निर्देशांकात मोठी वाढ झाली. सेन्सेक्स बँक निर्देशांक ३१४.०९ अंशाने वाढत ५३१५१.६२ पातळीवर वाढला तर निफ्टी बँक निर्देशांक २१४.७० अंशाने वाढत ४६८१४.९ पातळीवर पोहोचला आहे.
 
आज निफ्टी निर्देशांक २२०५३.९५ पातळीवर उघडला होता. सेन्सेक्स ७२६७५.८२ पातळीवर सकाळी उघडला होता. सकाळच्या सत्रात सर्वाधिक फायदा तेल व गॅस समभागात झाला आहे. निफ्टी तेल गॅस निर्देशांकात १.३४ टक्क्याने वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात केवळ निफ्टी हेल्थकेअर समभाग ०.११ टक्क्याने घसरले असून बाकी क्षेत्रीय निर्देशांकात 'हिरवा' कंदील कायम राहिला आहे.
 
सनोफी इंडिया कंपनीचा समभाग (शेअर) सिप्ला कंपनीशी हातमिळवणी केल्यानंतर सकाळच्या सत्रात वाढला आहे. इंट्राडेट्रेडिंगमध्ये कंपनीच्या समभागात ४ टक्क्याने वाढ झाली आहे तर काल अदानी पोर्टस कंपनीने गोपालपूर पोर्टचे अधिग्रहण केल्यानंतर सकाळच्या सत्रात कंपनीचा समभाग २.५५ टक्क्याने वाढला आहे. तर मारूती (२.७०) बजाज ऑटो (१.८९) तर सेंट्रल डिपोझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) मात्र ७ टक्क्याने घसरला आहे.
 
बीएससीवर मारूती सुझुकी, रिलायन्स, लार्सन, अल्ट्राटेक, एक्सिस बँक,कोटक महिंद्रा, एचसीएलटेक, बजाज फिनसर्व्ह, एचयुएल, एशियन पेटंस, एचडीएफसी बँक या समभागात वाढ झाली असुन नुकसान नेसले, विप्रो, जेएसडब्लू स्टील या समभागात झाले तर एनएससीवर मारूती, अदानी पोर्टस, रिलायन्स,आयशर मोटर्स, एक्सिस बँक, कोटक बँक,अल्ट्राटेक सिमेंट,एचसीएलटेक,एचडीएफसी लाईफ,टायटन या समभागात झाला असून ब्रिटानिया, हिरो मोटोकॉर्प, डॉ रेड्डीज, युपीएल, विप्रो ,ग्रासीम इंडस्ट्रीज, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट या समभागात झाले आहे.