'जय श्रीराम' म्हटल्या प्रकरणी धर्मांधांचा जळफळाट

मिरा रोडमध्ये अल्पवयीन मुलास घेरले!

    27-Mar-2024
Total Views |
  
Mira Road
मुंबई : मिरा रोड (Mira Road) परिसरात ५ धर्मांधांनी मिळून एका अल्पवयीन हिंदू मुलाला 'अल्ला हू अकबर'ची घोषणा देण्यास बळजबरी केल्याचा प्रकार धुलिवंदनच्या रात्री घडला. ११ वर्षांच्या या मुलाने नेहमीप्रमाणे सोसायटीच्या वॉचमनला 'जय श्री राम' म्हणत अभिवादन केले. ते पाहून धर्मांधांचा जळफळाट झाल्याने त्यांनी मुलाला सोसायटीच्या आवारातच घेरले. धर्मांधांची ओळख अद्याप पटली नसून मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
मुलगा रात्री एका कामासाठी सोसायटीच्या बाहेर गेला होता. परत येताना त्याने सोसायटीच्या वॉचमनला जय श्री राम म्हणत अभिवादन केले. याच दरम्यान रस्त्याच्या पलिकडे उभ्या असलेल्या धर्मांधांनी या मुलास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो मुलगा सोसायटीच्या आत जाऊ लागल्याने धर्मांधही त्याचा पाठलाग करत सोसायटीत शिरले. संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून पाचही जण गेट तोडून सोसायटीत शिरताना दिसत आहेत.

हे वाचलंत का? : उबाठा गटाची पहिली यादी जाहीर; अनेक जागांवर धक्कातंत्राचा वापर!

त्यानंतर त्यांनी 'जय श्री राम' म्हणत असलेल्या मुलाला पकडून 'अल्लाह हू अकबर' म्हणण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. मुलाच्या म्हणण्यानुसार धर्मांधांनी त्यास 'जय श्रीराम म्हणणे निरुपयोगी असून अल्लाह हू अकबर म्हण' असे म्हणत दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन मुंबईतील मीरा रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. सर्व आरोपी अल्पवयीन असल्याचेही सांगण्यात येत आहे. पाचही आरोपींवर भारतीय दंड संहिता (IPC) कलम ४४८, २९५-अ आणि १४३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

धर्मांधांनी शांतता भंग करू नये!
आपण जय श्रीराम, जय जिनेंद्र आधीपासूनच म्हणत आलो आहोत.
मग आताच असे वातावरण तयार करायची गरज काय. शांतता भंग करून वातावरण खराब करण्याचा प्रयत्न धर्मांधांनी करू नये. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना पकडून कठोर शिक्षा करावी.
- गीता जैन, आमदार, भाजप