महाएमटीबी शेअर बाजार विश्लेषण: सेन्सेक्स निफ्टी वधारला क्षेत्रीय निर्देशांकात मात्र संमिश्र प्रतिसाद

अमेरिकेतील जीडीपी डेटाकडे बाजाराचे लक्ष, बँक निफ्टी वधारला मेटल समभागात नुकसान कायम

    27-Mar-2024
Total Views |

Stock Market
 
Stock Market Analysis - 
 
मोहित सोमण
 
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकाळप्रमाणेच अखेरच्या सत्रात भरघोस वाढ झाली आहे.काल युएसमधील कनज्यूमर इंडेक्समधील निकाल काय येतील या सावधतेचे परिणाम आशियाई बाजारात दिसत होते. मात्र आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेअर बाजारात समभागात वाढ कायम राहीली आहे.आज गुंतवणूकदारांना आजच्या गुंतवणूकीत चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
 
सेन्सेक्स निफ्टी निर्देशांकात आज अखेरीस चांगली वाढ झाली आहे. सेन्सेक्स बाजार बंद होताना ५२६.०१ अंशाने वाढ होत ७२९९६.३१ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ११८.९५ अंशाने वाढत २२१२३.६५ पातळीवर पोहोचला आहे. आज सेन्सेक्स बँक निर्देशांक २४१.८७ अंशाने वाढत ५३०७९.४० पातळीवर पोहोचला तर बँक निफ्टी १८५.७५ अंशाने वाढत ४६७८५.९५ पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसीवरील सर्वच्या सर्व निर्देशांक आज 'हिरवे' असून एस अँड पी सेन्सेक्स मिडकॅप स्मॉलकॅप मध्येही अनुक्रमे ०.०९४ टक्क्याने व ०.७० टक्क्याने वाढ झाली असल्याने मिडकॅप स्मॉलकॅप कंपनीच्या मूल्यांकनात आज वाढ झाली आहे. एनएससीवरील बहुतांश निर्देशांक 'हिरवे ' राहिले असून मात्र एनएससी मिडकॅपमध्ये ०.१० टक्क्याने नुकसान झाले असून स्मॉलकॅपमध्ये मात्र ०.६३ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
एनएससीवरील सेक्टोरल इंडायसेसमध्ये (क्षेत्रीय निर्देशांकात) आज संमिश्र प्रतिसाद राहिला आहे. यामुळे आजची झालेली मूल्यांकनात संमिश्र वाढ ही विशिष्ट क्षेत्रीय निर्देशांकात झालेली दिसून आली आहे.
 
बँक निफ्टी (०.४०%) बरोबर निफ्टी ऑटो (०.५१ %) फायनांशियल सर्विसेस (०.०९ %), खाजगी बँका, रिअल्टी (०.८५ %) कनज्यूमर ड्युरेबल्स (०.६६ %) तेल गॅस (०.५४%) या समभागात वाढ झाली असून निफ्टी एफएमसीजी,आयटी, मेटल, फार्मा, पीएसयु बँक, मिडिया समभागात मात्र गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे. 
 
दिवसभरात आज बीएससीवर ३९४९ कंपनीच्या समभागांचे ट्रेडिंग झाले असताना १५२४ कंपनीच्या समभागातील मूल्यांकन वाढले तर २३१४ समभागांच्या मूल्यांकनात मात्र नुकसान झाले आहे.१२९ कंपनीच्या समभागाचे ५२ आठवड्यातील सर्वाधिक किंमत राहिली तर १५३ कंपनीच्या समभागांची किंमत ५२ आठवड्यातील मूल्यांकन कमी राहिले आहे. बीएससीवर (BSE) वर २२ कंपनीचे समभाग आज अप्पर सर्किटवर पोहोचले असून ३ कंपनीचे समभाग आज लोअर सर्किटवर राहिले आहेत.
 
एनएससीवर (NSE) वर २७२२ कंपनीच्या समभागांचे ट्रेडिंग झाले असताना ११३६ कंपनीच्या समभागांच्या मूल्यांकनात वाढ झाली आहे तर १४९१ कंपन्यांच्या समभागाचे मूल्यांकन घसरले आहे. ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ ५० समभागात झाली असून १२७ समभागांच्या मूल्यांकनात सर्वाधिक घसरण झाली आहे. यातील ११५ समभाग आज अप्पर सर्किटवर पोहोचले असून १६९ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.एनएससीवर २२ कंपनीच्या समभागात मोठा फायदा झाला असून २७ कंपन्यांच्या समभागात आज गुंतवणूकदारांना नुकसान सहन करावे लागले आहे.
 
दिवसभरात सर्वाधिक बीएससी सेन्सेक्सची पातळी ७३१२७.३७ पातळीवर पोहोचला आहे तर अखेरच्या सत्रापर्यंत निफ्टीची सर्वाधिक पातळी २२१९३.६० पातळीवर पोहोचली आहे.आज भारतीय रुपया अखेरीस युएस डॉलरच्या तुलनेत प्रति डॉलर ८३.३६ रुपयांपर्यंत पोहोचला.अखेरीस डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वधारली होती. भारतीय रुपया शेवटी ८३.३६ रुपयांना बंद झाला आहे.
 
बीएससीवरील कंपनीच्या बाजारी भांडवल (मार्केट कॅपिटलायझेशन) मध्ये ३८३ लाख कोटीहून अधिक असून एनएससीवरील कंपनीचे बाजारी भांडवल ३८०.५३ लाख कोटींपर्यंत पोहोचले आहे.
 
बीएससीवर सर्वाधिक फायदा रिलायन्स, मारूती सुझुकी, बजाज फायनान्स, टायटन, कोटक महिंद्रा, इंडसइंड बँक, लार्सन, एम अँड एम, एक्सिस बँक,भारती एअरटेल, सनफार्मा, एनटीपीसी या समभागात झाला असून नुकसान विप्रो, एचसीएलटेक, टीसीएस, एसबीआय, नेसले, बजाज फिनसर्व्ह, जेएसडब्लू ,टेक महिंद्रा, एचयुएल या समभागात झाले आहे.
 
एनएससीवरील रिलायन्स, मारूती, बजाज ऑटो, बजाज फायनान्स, अदानी पोर्टस एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, एम अँड एम, इंडसइंड बँक, सनफार्मा, टाटा स्टील या समभागात झाले असून नुकसान युपीएल, हिरो मोटोकॉर्प, डॉ रेड्डीज, ग्रासीम, डिवीज, ब्रिटानिया, टाटा मोटर्स, नेसले इंडिया, कोल इंडिया, विप्रो, टाटा कनज्यूमर, बजाज फायनान्स, जेएसडब्लू स्टील या समभागात झाले आहे.
 
शेअर बाजारात आज क्षेत्रीय निर्देशांकात मिश्र संकेत मिळत असलेतरी स्मॉलकॅपच्या चांगल्या प्रदर्शनाने आज बाजारात वाढ झाली आहे. क्रूड तेलाच्या किमती सकाळी डॉलरच्या किंमतीत घट झाल्याने स्थिर राहिली आहे.युएसमध्ये PPI (Purchasing Power Index) घोषित होण्याच्या मार्गावर असताना युएस शेअर बाजारात गुंतवणूकदार सावधतेने पाऊल टाकताना दिसले आहेत. आशियाई बाजारात युएस डॉलरच्या तुलनेत जपानच्या येन मध्ये ३० वर्षातील सर्वाधिक पडझड झाली असताना जपानच्या बँकेने काही उपाययोजना करण्यासाठी ठरवले आहे.
 
युएस फेडरल रिझर्व्ह बँके दर कपात किती होईल यापेक्षा गुंतवणूकदारांचे लक्ष एकूण महागाई दर तसेच युएसमधील क्रयशक्ती डेटा (PPI) जाहीर होण्याची अपेक्षा याकडे लागले होते. परिणामी PCE (Personal Consumption Expenditure) मध्ये ०.४ टक्क्याने वाढ होऊ शकते शिवाय 'वर्षानुवर्षे' आधारावर महागाईत देखील ०.३ टक्क्यांची वाढ मागील महिन्यात झालेली असू शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. उद्या अमेरिकेचा जाहीर होणार जीडीपी डेटाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. म्हणूनच या विविध मुद्यांवर लक्ष असताना युएसमधील तिन्ही शेअर बाजारात यांचे परिणाम दिसत तीनही बाजारात घसरण झाली आहे. मात्र भारतातील आशियाई बाजारात यांचा सकारात्मक परिणाम दिसून सकारात्मक नोटवर बाजार बंद झाले आहे.
 
आजच्या शेअर बाजारातील परिस्थितीविषयी मुंबई तरूण भारतला प्रतिक्रिया देताना बोनझा पोर्टफोलिओ लिमिटेडचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले,'आज निफ्टी ०.५३ % ने २२१२३ वर सकारात्मक नोटवर बंद झाला तर सेन्सेक्स ०.७३ % ने वाढून ७२९९६ वर बंद झाला. निफ्टी इन्फ्रा आज अनुक्रमे १.०८ % ने सेक्टर आउटपरफॉर्म होता. वेलस्पन कॉर्पच्या पूर्ण मालकीची उपकंपनी सिंटेक्स-बीएपीएल लिमिटेड द्वारे तेलंगणा, ओडिशा, मध्य प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर राज्यांमध्ये उत्पादन युनिट्स स्थापन करण्यासाठी २३५५ कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. पुढील दोन आर्थिक वर्षांमध्ये, FY25 आणि FY26 मध्ये कर्ज आणि इक्विटीच्या संयोगाने प्रकल्पांना वित्तपुरवठा केला जाईल.
 
ICICI सिक्युरिटीजच्या डिलिस्टिंगच्या बाजूने मत देण्यासाठी ICICI बँकेने अल्पसंख्याक भागधारकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे बँकेवर टीकेची झोड उठली आहे. ICICI बँक ७५% उपकंपनी असलेल्या ICICI सिक्युरिटीजला स्वतःमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. ICICI सिक्युरिटीजमधील प्रत्येक शेअरसाठी, कर्जदाता गुंतवणूकदारांना ICICI बँकेचे ०.६७ टक्के शेअर्स देत आहे. ICICI सिक्युरिटीजचे भागधारक, तथापि, ICICI बँकेचे शाखा अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्याकडून सतत कॉल्स आल्याने त्यांचा असंतोष व्यक्त करतात.
 
वापरकर्त्यांनी सांगितले की बँक कर्मचारी मतदानाच्या निकालावर प्रभाव टाकण्यासाठी रिटेल भागधारकांच्या संपर्कात होते. आयसीआयसीआय बँकेच्या अधिकाऱ्यांनी स्टॉकहोल्डर्सना डिलिस्टिंग प्रक्रियेवर मत दिले आहे की नाही हे शोधण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. रिलायन्स, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, टायटन, बजाज फायनान्स हे निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले तर हिरो मोटोकॉर्प, टाटा कॉन्स. प्रॉड,अपोलो हॉस्पिटल, विप्रो, डॉ रेड्डी लॅब्स निफ्टीमध्ये सर्वाधिक तोट्यात होते.'
 
आजच्या बँक निफ्टीमधील हालचाली बाबत मुंबई तरुण भारताला प्रतिक्रिया देताना, एलकेपी सिक्युरिजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले,"बँक निफ्टीने एक बाजूचे ट्रेडिंग सत्र अनुभवले, एकत्रीकरणाने चिन्हांकित केले, परंतु शेवटी, तेजीची गती कायम राहिली. हे एकत्रीकरण असूनही, निर्देशांक त्याच्या २० -दिवसांच्या मूव्हिंग सरासरीच्या (20DMA) खाली बंद झाला व ४६९५० वर स्थित आहे. वरील एक निर्णायक ब्रेक या पातळीमुळे ४८००० मार्कच्या दिशेने तीव्र शॉर्ट-कव्हरिंग हालचाली सुरू होण्याची अपेक्षा आहे. तथापि, निर्देशांकाला ४६५०० - ४६६०० झोनच्या आसपास समर्थन मिळते आणि या पातळीच्या खाली गेल्यास विक्रीचा दबाव वाढू शकतो."
 
आजच्या निफ्टीमधील वाढीबाबत प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले, " निफ्टी वाढीसह ओपनिंगनंतर मजबूत राहिला. दिवसभरात, तो २२१०० च्यावर गेला आणि त्याच्या वरही बंद झाला.अल्पकालीन गती सकारात्मक दिसते, RSI (१४) निर्देशकामध्ये क्रॉसओव्हरद्वारे समर्थित आहे. ट्रेंड हा आहे जोपर्यंत ते २२००० च्या वर राहील तोपर्यंत सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. वरच्या बाजूस, ते संभाव्यतः २२३०० च्या दिशेने आणि अल्पावधीत पुढे जाऊ शकते."
 
आजच्या बाजारातील स्थितीविषयी मुंबई तरूण भारतशी बोलताना रेलिगेअर ब्रोकिंग लिमिटेडचे एसव्हीपी अजित मिश्रा म्हणाले, 'संमिश्र संकेतांमध्ये बाजाराने ताकद दाखवली आणि अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ केली. गॅप-अप स्टार्टनंतर, निफ्टीने बहुतांश सत्रात हळूहळू उच्चांक गाठला, परंतु शेवटच्या तासात नफा घेतल्याने फायदा कमी झाला. अखेरीस, तो २२१५९ स्तरांवर (०.५% वर) स्थिरावला.दरम्यान, क्षेत्रीय आघाडीवर संमिश्र कल कायम राहिला ज्यामध्ये ऊर्जा आणि ऑटोने चांगली कामगिरी केली तर आयटी आणि एफएमसीजी लाल रंगात बंद झाले. व्यापक निर्देशांकांमध्येही असाच कल दिसून आला ज्यामध्ये स्मॉलकॅप एक टक्क्यांहून अधिक वाढला तर मिडकॅप फ्लॅट बंद झाला.
 
निफ्टीने अखेरीस शॉर्ट टर्म मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच २० DEMA चा अडथळा पार केला आहे परंतु रिबाउंड वाढवण्यासाठी आम्हाला २२,२०० च्या वर टिकाव लागेल. तसेच, संपूर्ण मंडळात अजूनही अस्थिरता जास्त असल्याने व्यापाऱ्यांनी स्टॉक निवड आणि जोखीम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जीओजीत फायनान्सशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'निरोगी आर्थिक वाढीच्या अंदाजामुळे स्टॉक-विशिष्ट क्रिया आणि सकारात्मक अंडरकरंट्समुळे बाजार सकारात्मक बंद होण्याच्या दिशेने गेला.तथापि, सुट्टीच्या नेतृत्वाखालील कापलेल्या आठवड्यामुळे, गुंतवणूकदार आता उद्याच्या US GDP डेटावर आणि बाजाराची दिशा मोजण्यासाठी पुढील आठवड्याच्या RBI धोरणाच्या घोषणेवर लक्ष केंद्रित करत आहेत.मिड- आणि स्मॉल-कॅप स्पेस चांगली कामगिरी करत आहेत कारण गुंतवणूकदारांना सौदेबाजीच्या संधी मिळाल्या आहेत, परंतु खंड कमी आहेत."