“मी मतदान करणार आणि तुम्ही?”; अजिंक्य देव यांचा मतदानाबद्दलचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

    27-Mar-2024
Total Views |
लोकसभा निवडणूक २०२४ जाहिर झाली असून आता सर्व राजकीय पक्ष आपापल्या तयारीला लागले आहेत.
 

ajinkya deo  
 
मुंबई : देशात लोकसभेचे (Loksabha Elections 2024) बिगुल वाजले आहे. काही कलाकार विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी उभे राहिले आहेत. अशात अभिनेते अजिंक्य देव यांनी व्हिडिओच्या (Loksabha Elections 2024) माध्यमातून नागरिकांना मतदानाचे महत्व आणि देशाचे एक जबाबदार नागरित म्हणून आपले कर्तव्य कसे आहे याचे महत्व पटवून दिले आहे.
 
काय म्हणाले अजिंक्य देव?
 
अजिंक्य देव यांनी व्हिडिओच्या माध्यमातून देशातील नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून दिले आहे. ते म्हणाले की, “आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की, लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर झाल्या आहेत. त्यामुळे कृपया जाऊन मतदार यादीमध्ये तुमच्या नावाची नोंद आहे का? सगळी माहिती अपडेट केलेली आहे का? मतदान हा आपल्याला दिलेला मोठा अधिकार आहे;त्यामुळे त्याचा वापर आपण करायलाच हवा. तेव्हा २० मे २०२४ रोजी मी मतदान करणार आहे आणि तुम्ही सुद्धा मतदान करायचे आहे”.
 
 
 
दरम्यान, अभिनेत्री कंगना रणावत हिला भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी जाहिर केली आहे. त्यामुळे मनोरंजनसृष्टीत काम करत असताना आता कंगना राजकारणात देखील सक्रिय होणार असे दिसत आहे.