मोठी बातमी: भारताच्या निर्यातीत वाढ झाल्याने चालू खात्यातील वित्तीय तूट कमी झाली - आरबीआय

भारताची वित्तीय तूट १.२ टक्क्याने कमी झाली

    27-Mar-2024
Total Views |


RBI
 
मुंबई: भारताचे करंट अकाऊंट डेफिसिट (चालू खात्यातील तूट) जीडीपीच्या तुलनेत १.२ टक्क्याने कमी झाली आहे.ऑक्टोबर - डिसेंबर महिन्यातील वाढलेल्या निर्यातीमुळे वित्तीय तूट भरून निघाली असल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे.
 
नुकतेच २२३-२४ आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत तूट १०.५ अब्ज डॉलर्सपर्यंत असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. ही तूट मागील वर्षीच्या तिमाहीत ११.४ अब्ज डॉलरपर्यंत गेली असल्याचे आरबीआयने म्हटले होते. मात्र व्यापारी तूट (Merchandise Trade Deficit) मध्ये आर्थिक वर्ष २२-२३ मधील ७१.३ अब्ज डॉलरच्या तुलनेत ७१.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचले असल्याचे या आकडेवारीत म्हटले आहे.
 
इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) सेवा निर्यातीत देखील मोठी वाढ झाली आहे. ही वाढ ५.२ टक्क्याने झाली असून सॉफ्टवेअर, व्यापारात व पर्यटनात वाढ झाल्याने ही वाढ दर्शवली गेली आहे. एकूण सेवांच्या उत्पादनात वाढ झाल्याने तुलनेने डेफीसिट
(वित्तीय तूट) कमी झाल्याचे चित्र दिसत आहे असे रिझर्व्ह बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
 
मागील वर्षाच्या तुलनेत गुंतवणूक योजनांमधील गुंतवणूकीत वाढ झाल्याने गूंतवणूक १३.२ अब्ज डॉलर पोहोचली आहे.मागील वर्षी ही गुंतवणूक १२.७ अब्ज डॉलर होती. परदेशातील अनिवासी भारतीयांनी भारतीय चलनात आवक केल्याने परकीय चलनातून २ टक्के अधिक चलन भारताला मिळाले आहे.परिणामी ही रक्कम ३१.४ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे.
 
देशातील एफडीआय (Foreign Direct Investment) परकीय गुंतवणूकीत मोठी वाढ झाली असून आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तुलनेतील २ अब्ज डॉलरमध्ये वाढ होत २३-२४ या वर्षी ४ अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. याशिवाय FPI (Foreign Portfolio Investment) मध्येही गुंतवणूकीत वाढ होत मागच्या वर्षीच्या ४ अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदा १२ अब्ज डॉलर झाली आहे.
 
आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये बाह्य व्यवसायिक कर्जात किंचीतशी वाढ मात्र झाली आहे. मागच्या आर्थिक वर्षाच्या २.५ अब्ज डॉलरवरून कर्जाची संख्या २.६ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच एकूणच जीडीपीच्या तुलनेत भारताची दुसऱ्या तिमाहीत वित्तीय तूटीत १.० टक्क्यांवरून १.३ टक्क्यांपेक्षा वाढ झाली आहे.
 
याखेरीज विदेशी मुद्रा (Foreign Exchange Reserves) मध्ये (BoP) बेसिसवर वाढलेल्या आर्थिक वर्ष २२-२३ मधील ११ अब्ज डॉलरच्या तुलनेत आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये विदेशी मुद्रांत ६ अब्ज डॉलर्सने वाढ झाली असल्याचे आरबीआयच्या निरिक्षणात म्हटले गेले आहे.