आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताचा जीडीपी दर ६.८ टक्के राहणार?

ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीचे मोठे भाकीत

    27-Mar-2024
Total Views |

GDP Growth
 
मुंबई: ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने भारताच्या जीडीपी दराबाबत मोठे भाकीत केले आहे. मॉर्गन स्टॅनलीने म्हटल्यानुसार कंपनीचा जीडीपी (सकल देशांअंतर्गत उत्पादन) आर्थिक वर्ष २०२४-२०२५ करिता ६.५ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. भारताच्या विकासाच्या यशोगाथेत वाढलेले औद्योगिक उत्पादन तसेच देशातील वाढलेल्या भांडवली खर्चामुळे (Capital Expenditure) मुळे देशाच्या जीडीपीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे मॉर्गन स्टॅनलीने म्हटले आहे.
 
कंपनीने रिपोर्टमध्ये दावा केल्यानुसार आर्थिक वर्ष २०२४ मध्ये जीडीपी ७.९ टक्क्यांवर राहणार आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये मार्चच्या तिमाहीत जीडीपी दर ७ टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता असून GVA (Gross Value Added) म्हणजेच सकल मूल्यवर्धित हे ६.३ टक्क्यांमध्ये व आर्थिक वर्ष २०२४ मधील जीडीपीत ७.९ टक्के दर राहील असे कंपनीकडून आपल्या म्हटले आहे.
 
याशिवाय उत्पादकतेत वाढ,विकासदरात सातत्य व वाढलेला वेग लक्षात घेता 'मायक्रो '(एकूणच)अर्थव्यवस्थेत झळाळी येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीने सीपीआय (Consumer Price Index) बाबत आपले मत मांडले आहे. यंदा सीपीआय महागाई दर आर्थिक वर्ष २५-२६ मध्ये ४.५ टक्के राहू शकतो व चालू डेफिसीट (चालू खात्यातील तूट) जीडीपीतील १ टक्के असू शकते असा कयास मॉर्गन स्टॅनलीने मांडला आहे.