जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर घसरले !

एमसीएक्सवर क्रूड तेलात प्रति बॅरेल ७७ रूपयांनी घसरण

    27-Mar-2024
Total Views |

Crude Oil
 
मुंबई: काल ओपेक सदस्य देशांनी तेलाच्या उत्पादनात घट करायचे ठरवल्यानंतर रशियानेही तेलाचे उत्पादन कमी करण्याचे ठरवले होते. युक्रेनने रशियन कच्च्या तेलाच्या (क्रूड) खाणीवर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला केल्याने रशियाने तेलाचे आऊटपूट कमी करण्याचे ठरवले होते. तेलाच्या वाढत्या मागणीमुळे व तेलाचे उत्पादन कमी झाल्याने एकूण बाजारात तेलाचा तुटवडा होता.परंतु दुसरीकडे डॉललचे मूल्यांकन कमी झाल्याने क्रूड तेलाचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.
 
आज वैश्विक पातळीवरील क्रूड तेलाच्या भावात घसरण झाली आहे.WTI Futures (Western Texas Indices) मधील क्रूड निर्देशांकात ०.९२ टक्क्याने घट झाली असून क्रूड निर्देशांक ८०.८८ युएसडी डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पोहोचला आहे तर Brent Oil Futures क्रूड तेलाच्या निर्देशांकातही घसरण कायम राहत ०.९ टक्क्याने क्रूड ऑइलची घसरण झाली आहे.ब्रेंट क्रुड निर्देशांक प्रति बॅरेल ८४.८३ युएसडी डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.
 
तर MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) मधील क्रूड निर्देशांकात १.७ टक्क्याने घसरण झाल्याने एमसीएक्स क्रूड निर्देशांक ६७४४ रूपये प्रति बॅरेल झाला आहे. प्रति बॅरेल किंमतीत ७७ रूपयांनी एमसीएक्स (MCX) निर्देशांकात घट झाली आहे.
 
आयसीआयसीआय बँकेच्या रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, येणाऱ्या काळात ब्रेटं निर्देशांक प्रति बॅरेल ९० ते ९५ डॉलर पोहोचू शकतो.त्यामुळे जागतिक पातळीवर अस्थिरता तेलाच्या भावात देखील अस्थिरता आणू शकते असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. आज मात्र जगातील क्रूड तेलाच्या भावात घसरण झाल्याने त्यांचे परिणाम आशियाई बाजारातील देखील दिसून येत आहेत.