मोठी बातमी: ३० व ३१ तारखेला आरबीआय कार्यालय खुले राहणार

क्लिअरिंग व्यवहार करण्यासाठी आरबीआयचे विशेष सत्र

    27-Mar-2024
Total Views |

RBI
 
मुंबई: करदात्यांच्या सोयीसाठी आरबीआयने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारी व्यवहारातील व्यवस्थापनात कुठलीही अडचण येऊ नये यासाठी आरबीआय (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) येत्या शनिवारी व रविवारी ३० व ३१ मार्चला कार्यरत असल्याचे आरबीआयने घोषित केले आहे.
 
विशेष सरकारी खात्यातील व्यवहारांचे क्लिअरिंग करण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला. विशेषतः सरकारी चेकचे क्लिअरिंग या दिवशी पार पडणार आहे. यादिवशी इतर बँकेचे कामकाज देखील सुरू राहणार आहे.
 
सरकारी कार्यालयातील सगळे अडलेले व्यवहार यादिवशी पूर्ण होतील. केंद्र व राज्य सरकारच्या व्यवहारांसाठी खासकरून जीएसटी (गुड्स सर्विसेस टॅक्स) टिन २.० (टॅक्सपेअर आयडिंटिफिकेशन नंबर) आयसीईजीएटीई (ICEGATE) (इंडियन कस्टम ईडीआय गेटवे) इ- रिसिटस अशा विविध प्रकारच्या व्यवहारांचे क्लिअरिंग आरबीआयच्यावतीने करण्यात येणार आहे.
 
या स्पेशल सत्रात सगळ्या बँकांना क्लिअरिंगसाठी आरबीआयने विचारणा केली असून या दिवशी आरबीआयचे कामकाज सुरू राहणार आहे. आरबीआय,बँक याशिवाय इन्कम टॅक्सचे कार्यालय देखील करदात्यांसाठी सुरू राहणार आहे. मार्च ३१ पर्यंत सगळ्या टॅक्स देयकांना आयकर (Income Tax) भरण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागणार आहे.
 
सलग ३ दिवस सुट्या आल्याने व्यवहारांचे क्लिअरिंग लवकर होऊन कामात सुसूत्रता वाढवण्यासाठी हा निर्णय आरबीआयने घेतला आहे.