मुंबईत सर्वाधिक मागणी २ बीएचकेला - अहवाल

प्रोइंडेक्स मॅजिकब्रिक्स अहवालामध्ये नवीन माहिती उघड

    27-Mar-2024
Total Views |

Mumbai
 
मुंबई: मुंबईत घर घेणे सोपे नाही तर अनेक जणांचे मुंबईत घर घेणे स्वप्न असते त्याच रियल इस्टेटमध्ये कोविडकाळात मंदीचे सावट आले तरी आता मात्र या सेक्टरमध्ये त्या तुलनेत मागणी व पुरवठ्यात वाढ झाली आहे. यासंबंधी नुकताच एक सर्व्हे अहवाल प्रोइंडेक्स मॅजिकब्रिक्समध्ये मुंबईतील सर्वाधिक मागणी व पुरवठा २ बीएचके घरांना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
अहवालानुसार,आर्थिक वर्ष २०२४ मध्ये तिमाही बेसिसवर घरांच्या मागणीत ३.१ टक्क्याने वाढ झाली होती. मात्र लिस्टिंग
(नोंदणीत) १.१ तिमाही बेसिसवर घट झाली आहे. एकूणच निवासी घरांच्या किंमतीत तिमाही ते तिमाही बेसिसवर (QoQ) मध्ये ५ टक्क्याने दरवाढ झाली असल्याचे म्हटले गेले आहे.
 
१ बीएचके,२ बीएचके,३ बीएचके प्रकारात सर्वाधिक मागणी २ बीएचकेला असल्याचे अहवालात म्हटले आहे. एकूण मागणीपैकी ४८ टक्के मार्केट शेअर २ बीएचके घरांत असलेल्या मागणीचा असून त्यानंतर ३ बीएचके २६ टक्के, १ बीएचके २३ टक्के दर्शवला गेला आहे.या मागणीत सर्वाधिक मागणी ७५० ते १२५० स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या घरांना ग्राहकांनी पसंती दर्शविली आहे. विशेषतः पुरवठ्याहून मागणी अधिक असल्याचे यात स्पष्ट केले आहे.
 
सर्वाधिक मागणी १५००० ते २५००० रूपये स्क्वेअर फूट जागेला संभाव्य ग्राहकांनी दिली आहे.याप्रकाराच्या सदनिकेबरोबर इतर सुविधा पुरवण्यात येणाऱ्या इमारतींना अधिक पसंती असल्याचे म्हटले गेले आहे.

भाव बदलण्याच्या स्पर्धत १ बीएचके प्रथम -
 
इयर ऑन इयर बेसिसवर जागेच्या भावात फरक पडलेल्या सदनिकेत १ बीएचके वर्गवारीने प्रथम क्रमांक पटकावला आहे. १ बीएचके सदनिकांच्या मागणीत तिमाही बेसिसवर ६ टक्क्याने व इयर ऑन इयर बेसिसवर ८.२ टक्क्याने वाढ झाली आहे.
 
२ बीएचके सदनिकांच्या मागणीत तिमाही ४ टक्क्याने व इयर ऑन इयर बेसिसवर ४.५ टक्क्याने वाढ झाली आहे तर ३ बीएचके प्रकारातील सदनिकांच्या भावात ८.७ टक्क्याने तिमाही बेसिसवर वाढ झाली आहे तर इयर ऑन इयर बेसिसवर भावात ०.६ टक्क्याने वाढ झाली आहे.