“८३ वर्षांचं आयुष्य अवघ्या तीन तासांत”, 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटावर शरद पोंक्षेंची पोस्ट

26 Mar 2024 13:58:15
अभिनेता, दिग्दर्शक रणदीप हुड्डाने सर्वच स्तरांतून स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटासाठी कौतुक होत आहे.
 

sharad and randeep 
 
मुंबई : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ (Swatantryaveer Savarkar) चित्रपटाने खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच मने जिंकली आहेत. रणदीप हुड्डा याने सावरकरांचे जीवन आणि संघर्ष उत्तमरित्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना भावला आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दल अभिनेते शरद पोंक्षे यांनी विशेष पोस्ट केली आहे. याशिवाय अजय पुरकर, सुप्रिया पिळगांवकर यांनी देखील आवर्जून प्रेक्षकांना हा (Swatantryaveer Savarkar) चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
 
शरद पोंक्षे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये रणदीप हुड्डाचे कौतुक केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, “आज 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिला. ८३ वर्षांचं आयुष्य ३ तासात दाखवायचं अत्यंत अवघड,पण हुड्डा यांनी ते छान दाखवलंय. विशेषतः अंदमान पर्व त्यात केलेले दयेचे अर्ज ह्या सर्व गोष्टी पाहणाऱ्याला नीट लक्षात येतील व गैरसमज दूर व्हायला नक्कीच मदत होईल. हुड्डा ह्यांचे अभिनंदन”.
 
 
 
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं दिग्दर्शनही रणदीप हुड्डा यानं केलं आहे. तर अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने चित्रपटात यमुनाबाई विनायक सावरकर यांनी व्यक्तिरेखा साकारली आहे. हा चित्रपट २२ मार्च रोजी देशभरात प्रदर्शित झाला असून आत्तापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०.९६ कोटींची कमाई केली आहे.
Powered By Sangraha 9.0