'हनुमान'ची पकड अजूनही कायम; आणखी एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित

26 Mar 2024 15:03:39
हनुमान या दाक्षिणात्य चित्रपटाने अनेक रेकॉर्ड तोडत २०२४ मधील लोकप्रिय चित्रपटाचा मान मिळवला आहे.
 

hanuman  
 
मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटांनी सध्या प्रेक्षकांना भलतीच भूरळ घातली आहे. २०२४ मधील प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतीस आलेला चित्रपट म्हणजे ‘हनुमान’ (Hanuman). अभिनेता तेजा सज्जा (Teja Sajja) याची प्रमुख भूमिका असलेला हा 'हनुमान' (Hanuman) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. शिवाय जिओ आणि झी५ या ओटीटी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित झाला असूनही तिथेही या चित्रपटाला दमदार प्रतिसाद मिळत आहेत. आता आणखी एका ओटीटी वाहिनीवर हनुमान चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
 
हिंदी भाषेतील ‘हनुमान’ चित्रपट जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या चित्रपटाचा तेलगु व्हर्जन झी५ वर प्रदर्शित झाला. हिंदी आणि तेलगू भाषेनंतर आता, हा चित्रपट तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. हनुमान चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीजसाठी सज्ज झाला असून ५ एप्रिलपासून प्रेक्षकांना ओटीटीवर हा चित्रपट पाहता येणार आहे.
 
 
 
हनुमान चित्रपटाने हिंदी भाषेत ५२.०८ कोटींची कमाई केली होती. याशिवाय अन्य भाषांमधील एकूण कलेक्शन हे २००.३२ कोटी आहे. दरम्यान, हनुमान या चित्रपटाचा सिक्वेल देखील येणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली आहे. विशेष म्हणजे हिंदीतील अनेक मोठ्या चित्रपटांना मागे टाकत 'हनुमान' चित्रपट २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
Powered By Sangraha 9.0