दिया मिर्झाच्या आगामी प्रोजेक्टमध्ये मराठी कलाकारांची वर्णी

    26-Mar-2024
Total Views |
प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाचा आगामी प्रोजेक्ट 'पन्हं' लवकरच येणार भेटीला
 
 dia  
 
मुंबई : आजही ‘रहना है तेरे दिल मे’ हा चित्रपट तरुणाईचा आवडता चित्रपट आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) हिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये जरी कामं केली असली तर हा चित्रपट तिच्या चाहत्यांचा आवडता चित्रपट आहे यात शंका नाही. आता दियाचाच (Dia Mirza) नवा प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या नव्या कलाकृतीत अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत.
 
दिया मिर्झाची ‘पन्हं’ ही नवी शॉर्ट फिल्म लवकरच प्रदर्शित होणार असून या शॉर्ट फिल्मची दिया ही निर्माती आहे. दरम्यान या नव्या शॉर्ट फिल्ममध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप झळकणार आहे. यासंदर्भात त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “हृदयाच्या कोपऱ्यातला अत्यंत लाडका प्रोजेक्ट..’पन्हं'”.
 

pruthvik 
 
पृथ्वीक सोबत यात अभिनेत्री सायली संजीव देखील दिसणार असून तिने देखील स्टोरी पोस्ट करत लिहिले आहे की, “या प्रोजेक्टचा एक भाग होण्याचा मला खूप आनंद आहे”. ‘पन्हं’ मध्ये पृथ्वीक प्रताप आणि सायली संजीवबरोबर अभिनेता सुहास शिरसाट देखील झळकणार आहे. यासंदर्भात सुहासनेही इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. “एका दमदार टीमबरोबर नवीन काम”, असं लिहितं अभिनेत्याने क्लॅपचा फोटो शेअर केला आहे.
 

sayali
sayali  
 
दरम्यान, दिया मिर्झा निर्मित पन्हं या शॉर्ट फिल्मचा विषय़ नेमका काय असणार आहे? कधी प्रदर्शित होणार? या तीन मराठी कलाकारांसह अजून कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.