जागतिक पातळीवर क्रूड तेल महागणार? परिणामी भारतात भाववाढ?

मंगळवारी क्रूड निर्देशांक ८६ डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पोहोचला

    26-Mar-2024
Total Views |

Crude Oil
 
मुंबई: मंगळवारी पुन्हा एकदा क्रूड तेलाच्या भावात वाढ झाली आहे.पुन्हा एकदा पुरवठ्यात तुटवडा जाणवू लागल्यानंतर आता वाढलेली मागणी दक्षता घेता आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किंमतीत वाढ होत आहे.रशियातील तेलाच्या खाणीवर झालेला हल्ला, व तेल उत्पादनात झालेली घट यामुळे तेलाच्या भावात वाढ झाली आहे.
 
सकाळी ब्रेंट क्रुड निर्देशांकात वाढ झाली असून ब्रेंट क्रुड २३ सेंट्सने वाढले आहे. परिणामी क्रूड तेलाचे भाव ८६.९८ डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पोहोचला आहे. भारत हा प्रामुख्याने रशियातून तेल आयात करतो.तसेच रशियातील झालेल्या समस्येचे लोणआशियाई बाजारातील होण्याची चिन्हे दिसत आहेत.
 
दुपारपर्यंत WTI फ्युचर क्रूड निर्देशांकात मात्र ०.२० सेंटसने घट झाली आहे. व MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) मध्ये ०.०१ टक्क्याने घसरण होत प्रति बॅरेल किंमत ६८२३ रूपये होती. तरीही बाजारातील तणाव पाहता क्रूड तेलाच्या भावात अधिकच्या दबावामुळे किंमत वाढू शकते असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.
 
तेलाच्या भावात अजून घट होऊ शकते या अंदाजाने भारतीय इंधन कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या भावात प्रत्येकी २ रूपये कपात केली होती. दोन वर्षांनी झालेली ही पहिली घट होती परंतु सोमवारी व मंगळवारी वाढलेल्या दबावाने क्रूड तेलात भाव झाल्यास भारतातील इंधन दरात फरक जाणवू शकतो. गेल्या एक महिन्यात सरासरी ३ रूपयांनी क्रूड तेलाच्या भावात वाढ झाल्याचे चित्र आहे.