राजू शेट्टी यांच्या उमेदवारीवरुन मविआत गोंधळ

26 Mar 2024 17:05:42
raju shetti

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजु शेट्टी Raju Shetti MVA यांना पाठींब्यावरुन मविआमध्ये गोंधळ उडाला आहे. राजु शेट्टींनी मविआत सोबत यावे अशी इच्छा आहे. परंतु त्यांनी पाठींबा न घेतल्यास आम्हाला उमेदवार द्यावा लागेल असं मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
 
राजु शेट्टींच्या सोबत उबाठा गटाच्या नेत्यांच्या बैठका सुरु होत्या. त्यामुळे त्यावरुन ते महाविकास आघाडीत सामिल होतील अशी चित्र दिसत होती. परंतु सध्याची परिस्थिती पाहाता तसं काही चित्र दिसत नाही असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तर बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्याशी उद्धव ठाकरे संपर्कात होते त्यामुळे याबद्दल त्यांना विचारा असं पत्रकारांशी बोलताना म्हटलं.

हे वाचलत का ? - भाजपची लोकसभेची सहावी यादी जाहीर! वाचा सविस्तर
 
राजु शेट्टींना हातकणंगले लोकसभा मतदार संघाच्या जागेवर महाविकास आघाडी पाठिंबा देइल अशा चर्चा होत्या पण त्यामुळे महाविकास आघाडीत गोंधळ उडालेला पहायला मिळत आहे, पारंपारीकरीत्या हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे शिवसेनेने या ठीकाणी मागिल निवडणुकीत राजु शेट्टी यांचा पराभव केला होता.
 
शिवसेनेत फुट पडल्यानंतर येथिल खासदार धैर्यशिल माने यांनी शिंदेंची वाट धरली. त्यामुळे उद्धव ठाकरे येथुन उमेदवार देतील असं बोललं जात होत पण नंतर महाविकास आघाडी येथुन राजु शेट्टी यांना पाठींबा देणार अशी चर्चा सुरु होती पण त्या जागवरुन महाविकास आघाडी आणि राजु शेट्टी यांच्यात एकमत झालेलं नाही असंच चित्र आहे.

Powered By Sangraha 9.0