बिजिंगला मागे टाकत मुंबई आशियाई अब्जोपतींची राजधानी बनली

26 Mar 2024 18:14:41

Mukesh Ambani
 
मुंबई: हुरूनने श्रीमंतांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्या माहितीनुसार, बिजिंगला मागे टाकत मुंबई प्रथमच अब्जाधीशांची राजधानी बनली आहे.' एक्सलूजीव' श्रीमंतांच्या यादीत मुंबईला स्थान मिळाले आहे.मुंबईत अब्जाधीशांची संख्या ९३ सदस्य इतकी वाढली आहे. देशातील अब्जाधीशांचा संख्येत वाढ झाली असली तरी वैश्विक पातळीवरील वेल्थ दर हा ७ टक्केच असल्याचे हुरून ग्लोबल रिच लिस्ट २०२४ मध्ये म्हटले आहे.
 
याशिवाय वेल्थ क्रिएशन लिस्ट मध्ये मुंबईला प्राधान्य मिळाले असून मुंबई शहर जगातील सर्वाधिक आर्थिक वेगाने वाढणारे शहर असल्याचे स्पष्ट झाले आहे ‌. या यादीत मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला असून दिल्लीला या यादीत दहावे स्थान मिळाले आहे.
 
हुरून इंडियातील श्रीमंतांच्या यादीत पहिला क्रमांक मुकेश अंबानी यांनी पटकावत दुसरा क्रमांक गौतम अदानी यांनी प्राप्त केला आहे.तिसरा क्रमांक सायरस पुनावाला व कुटुंबाने पटकावला आहे. आता भारतात एकूण अब्जाधीशांची संख्या २७१ झाली असून चीनमधील अब्जाधीशांची संख्या ८१४ व अमेरिकेतील अब्जाधीशांची संख्या ८०० झाली आहे.
 
विशेषतः यादीत ९४ नवे अब्जाधीशांचे चेहरे समाविष्ट करण्यात आले असून मुंबई क्रमांक १ अब्जाधीशांचे शहर बनले आहे.मुंबईतील एकूण अब्जाधीशांचा संख्या ९३ वर पोहोचली आहे.
 
Powered By Sangraha 9.0