जीसीकनेक्ट लॉजिटेकचा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला

कंपनीकडून प्रति शेअर ४० रुपये प्राईम बँड निश्चित

    26-Mar-2024
Total Views |

IPO
 
मुंबई: जीसीकनेक्ट लॉजिटेक आयपीओ बिडिंगसाठी शेअर बाजारात खुला होणार आहे. २६ ते २८ मार्च या कालावधीत आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला असणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार कंपनीचे बीएससी (BSE) व एनएससीवर (NSE) वरील नोंदणी (लिस्टिंग) ३ एप्रिलपर्यंत होणार आहे. कंपनीकडून १४०१००० समभागांची इक्विटी इश्यू केला जाणार आहे.
 
कंपनीकडून प्राईज बँड प्रति समभाग ४० रूपये निश्चित करण्यात आला आहे.गुंतवणूकदारांना या आयपीओ खरेदीसाठी कमीत कमी ३००० समभागांचे २ गठ्ठे (Lot) विकत घ्यावे लागणार आहेत म्हणजेच गुंतवणूकदारांना ६००० समभाग विकत घ्यावे लागतील. या समभागांचे एकूण मूल्य २४०००० रूपयांपर्यंत असणार आहे.
 
फेडेक्स सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर असून केफिन टेक्नॉलॉजी इश्यूसाठी रजिस्टार म्हणून काम बघतील असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
 
कंपनीला या आयपीओ (Initial Public Offering ) मधून ५.६० कोटींचा निधी मिळवण्यासाठी उद्दिष्ट आहे. १ एप्रिलपर्यंत पात्र गुंतवणूकदारांना समभागांचे वाटप होऊ शकते. बीएससी एसएमई (BSE SME) ३ एप्रिलपर्यंत कंपनीची नोंदणी (लिस्टिंग) होणार आहे.
 
जीसीकनेक्ट कंपनीकडून अँकर गुंतवणूकदारांना किती रकमेची गुंतवणूक करणे शक्य होणार आहे ही माहिती संबंधित कंपनीकडून देण्यात आलेली नाही. परंतु किरकोळ गुंतवणूकदारांसाठी (Retail Investors) कंपनीकडून ४७.३२ टक्के वाटा गुंतवणूकदारांना खुला असेल.किरकोळ घाऊक गुंतवणूकदारांसाठी ६६३००० समभागांची विक्री करण्यात येणार आहे.
 
तेवढ्याच ६६३००० समभाग विना संस्थात्मक गुंतवणूकदारांना गुंतवणूकीसाठी खुले राहणार आहेत. कंपनीचा इयर ऑन इयर बेसिसवर आर्थिक वर्ष २३-२४ मध्ये १०१.०३ लाख महसूल प्राप्त केला असून कंपनीचा करोत्तर नफा (Profit After Tax) १०.८६ लाख रुपये होता.
 
जिगर विनोदभाई शेठ व विनोद वेनिलाल शेठ हून कंपनीचे प्रमोटर (संस्थापक) आहेत. जुलै २०२२ मध्ये सुरू झालेली कंपनी सप्लाय चेन मॅनेजमेंट कंपनी आहे.याशिवाय कंपनी गुड्स ट्रान्सपोर्ट व्यवसायात देखील आहे. कंपनीकडून सांगण्यात आलेल्या माहितीनुसार, वाहनांच्या खरेदीसाठी तसेच कंपनीचे संकेतस्थळ निर्मितीसाठी व दैनंदिन कामकाजासाठी या आयपीओतून मिळालेल्या निधीचा विनिमय केला जाणार आहे.