सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी ! १ तोळ्याला १०० रूपये कमी !

26 Mar 2024 15:27:35

Gold
 
मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रूड तेलाच्या भावात वाढ झाली असली तरी सोने ग्राहकांसाठी आज चांगली बातमी आहे.सोने प्रति ग्रॅम १० रूपयांच्या आसपास व प्रति १० ग्रॅम (१ तोळा) सोने १००० रूपयांनी स्वस्त झाले आहे. भारतातील एकूण बाजारात सरासरी सोनाच्या भावात घसरण झाली आहे.
 
२२ कॅरेट सोने भाव आज प्रति ग्रॅम ६११५ रूपयांने विकले जात आहे. काल २२ कॅरेट सोन्याचे भाव प्रति ग्रॅम ६१२५ रूपये होते. २२ कॅरेट सोन्याचे १० ग्रॅम ( १ तोळा) भाव देखील १०० रूपयांनी कमी झाले आहेत.देशभरातील सरासरी २४ कॅरेट सोन्याचे भाव हे प्रति ग्रॅम ११ रूपयांनी सराफा बाजारात घसरले आहेत.
 
काल २४ कॅरेट सोन्याच्या भावात कालच्या तुलनेत प्रति ग्रॅम ६६८२ पेक्षा ६६७१ रूपये प्रति ग्रॅम झाल्याने ११ रूपयांची घसरण झाली आहे.१० ग्रॅम सोनाच्या किंमतीतही ११० रूपयांनी घसरण झाली.२४ कॅरेट सोन्याच्या भावात कालच्या ६६८२० रूपयांच्या तुलनेत आजच्या भावात ११० रूपयांनी घसरण होत ६६७१० रूपये किंमत झाली.
 
१८ कॅरेट सोन्याच्या किंमतीतही १ ग्रॅम सोने दर घसरले आहेत. कालच्या ५०११ रूपयांच्या प्रति ग्रॅमच्या तुलनेत आज प्रति ग्रॅम ५००३ रूपये झाले आहेत.१८ कॅरेट सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम (१ तोळा) ८० रूपयांनी कमी झाले.
 
मुंबईतील सोन्याचे भाव कालच्या तुलनेत १० रूपयांनी घसरून प्रति ग्रॅम ६११५ रूपये झाले आहेत. २२ कॅरेट सोन्याच्या भावात देखील १० रूपयांनी घट होत प्रति ग्रॅम किंमत ६११५ रूपये झाली तर १० ग्रॅम सोने किंमत १०० रूपयांनी घसरण ६११५० रूपयांवर पोहोचली.
 
मुंबईत २४ कॅरेट सोन्याच्या दरात घसरण ११ रूपयांनी होत प्रति ग्रॅम सोने ६६७१ रुपये झाले तर १० ग्रॅम सोने किंमत ११० रुपयांनी घसरत ६६७१० रूपयावर पोहोचले आहे. १८ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅम ८ रुपयांनी घट होत सोने प्रति ग्रॅम ५००३ रूपयावर पोहोचले तर १० ग्रॅम सोने ८० रूपयांनी घसरण ५००३० रूपयांवर पोहोचले आहे.
 
Powered By Sangraha 9.0