वेदांता आपल्या प्रकल्पात अजून ६ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

25 Mar 2024 13:13:12

Anil Agrawal
 
मुंबई: आघाडीची मायनिंग कंपनी म्हणून ओळख असणाऱ्या वेदांता (Vedatna) कंपनीने आणि ६ अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. तसे वृत्तसंस्थेने म्हटल्याप्रमाणे,अल्युमिनियम,झिंक,स्टील,तेल गॅस अशा विविध उत्पादन घेणाऱ्या वेंदाता कंपनीने ६ अब्ज डॉलर उभे करण्याचे ठरवले आहे. गुंतवणूकदारांच्या बैठकीत कंपनीच्या पदाधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले आहे.
 
वेदांतांचे अनेक प्रकल्प सुरू आहेत.पन्नासहून अधिक प्रकल्पावर कंपनी काम करत असून आपला ईबीटीडीए (Earning Before Tax Depreciation Amortization) करापूर्वीचा नफा वाढवण्याचे लक्ष कंपनीने ठेवले आहे.
 
या आर्थिक वर्षातील मार्च ३१ पर्यंत कंपनीचे महसूल ६ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता कंपनीकडून व्यक्त केली आहे. तर ईबीटीडीए मध्ये पुढील आर्थिक वर्षात ६ अब्ज डॉलरपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर त्यापुढील आर्थिक वर्ष २६-२७ मध्ये ती वाढ ७.५ अब्ज युएसडी डॉलर्सपर्यंत जाण्याची शक्यता कंपनीने नोंदवली आहे.
 
झालेल्या गुंतवणूकदार बैठकीत कंपनीचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी 'पुढील २५ वर्षात कंपनीचा प्रवास पुढच्या स्तरावर असेल ' असे विधान केले.त्यांचे बंधू नवीन अग्रवाल यांनी यासंबंधीची विकासाची ब्लू प्रिंट बैठकीत मांडली आहे.
 
Powered By Sangraha 9.0