आज सोन्याचे भाव 'जैसे थे',जाणून घ्या आजचे सोनाचांदीचे दर.....

25 Mar 2024 12:48:20

Gold
 
मुंबई: आज २५ मार्च रोजी सोन्याच्या भावात कुठलाही बदल झालेला दिसत नाही. मार्चमध्ये सोन्याच्या भावात ६ टक्क्याने वाढ झाली आहे. शनिवारी सोनाच्या भावात घट झाली होती. २३ मार्चला प्रति ग्रॅम सोन्याची किंमत १० रुपयांने घट झाली होती.आज २५ मार्चला सोन्याचे भाव ' जैसे थे ' राहिले आहेत.भारतातील सोन्याचे सरासरी दर २२ कॅरेट सोने प्रति ग्रॅम ६१२५ रुपये असू़न २४ कॅरेट सोन्याचे प्रति ग्रॅम दर ६६८२ रूपये झाले आहेत.
 
भारतीय बाजारपेठेत २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १ ग्रॅम ६१२५ रूपये आहे.कालही प्रति ग्रॅम ६१२५ रूपये असल्याने कालच्या तुलनेत आज दरात कुठलाही बदल झालेला नाही. २४ कॅरेट सोन्याच्या भावात देखील कालपेक्षा कोणताही बदल झालेला नाही. २४ कॅरेट सोन्याचे प्रति १ ग्रॅम दर ६६८२ रूपये आहे. तर १८ कॅरेट सोन्याच्या भावातही बदल न होता प्रति ग्रॅम ५०११ रूपये दर सराफा बाजारात दिसत आहे.
 
मुंबईत २२ कॅरेट सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम (१ तोळा) किंमत ६१२५० रूपये असून २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम ६६८२० रूपये आहेत.१८ कॅरेट सोन्याचे दर हे ५०११० रूपये प्रति १० ग्रॅम आहेत.
 
चांदीच्या भावात आज प्रति ग्रॅम ०.३० पैशाने वाढ झाल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. भारतातील चांदीचे सरासरी दर १ ग्रॅममागे ०.३० पैशाने वाढले आहेत. आज प्रति १ ग्रॅम चांदीचा दर ७७.८० आहे. तर १ किलो चांदीचा दर ७७८०० रुपये इतका आहे. प्रति किलोमागे सोनाच्या दरात ३०० रूपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत चांदीचे दर हे प्रति ग्रॅम ७७८ रूपये असून प्रति किलो दर ७७८०० रुपये आहे.
 
Powered By Sangraha 9.0