मुंबई: आज सराफा बाजारात सोने खरेदीसाठी चांगला मुहूर्त आहे. होळीच्या पवित्र शुभारंभाला गुंतवणूकीची सुवर्णसंधी चालून आली आहे. देशात सरासरी सोनाच्या किंमतीत घट झाली आहे. भारतात सोन्याचे सरासरी दर प्रति ग्रॅम १० रूपयांनी घट झाली आहे. देशात एकंदर सोन्याची किंमत २२ कॅरेटसाठी ६२५ रूपये प्रति ग्रॅम व २४ कॅरेटसाठी ६६८२ रूपये प्रति ग्रॅम इतकी ठेवण्यात आली आहे.
देशात आज सोन्याच्या किंमतीत चांगली घट झाली आहे. प्रति १ ग्रॅम सोनाच्या किंमतीत १० रूपयांनी घसरण होत १ ग्रॅम प्रति २२ कॅरेट सोन्याचे भाव ६१३५ रूपये इतके दर्शविले गेले आहेत. तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात ११ रूपयांनी घट होत ६६९३ रूपये प्रति ग्रॅमवर झाली. मुंबईत १० ग्रॅमदर (१ तोळा) किंमत २२ कॅरेट सोने ६१२५० रूपये तर २४ कॅरेट सोन्याच्या दरात ६७४७० रूपये प्रति १० ग्रॅम (१ तोळा) आहे तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात आज प्रति तोळा ५०६६० रूपये इतका आहे.
एमसीएक्सवर सोने चांदीच्या निर्देशांकात आज वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोनाच्या दरात आज दरवाढ झाली. एमसीएक्सवर (MCX) वर सोने ०.०२ टक्क्याने तर चांदीच्या भावात ०.०३ टक्क्याने वाढ झाली आहे.
चांदीच्या भावात आज प्रति ग्रॅम ७७.५० रुपयांनी वाढ झाली आहे.१ ग्रॅम चांदीच्या किंमतीत १ रूपयांने वाढ झाली. प्रति १० ग्रॅम चांदीच्या भावात १० रूपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत १० ग्रॅम चांदीच्या भावात ७७५ रूपयांनी वाढ झाली आहे. देशात एक किलो चांदीची किंमत ७७५०० रूपये इतकी आहे. तर मुंबईतील एक किलो चांदीच्या किंमतीत ७७५००० दरात वाढ झाली आहे.