महाराष्ट्रातील ५५ नद्या जलप्रदूषणाने बेजार

देशात सर्वाधिक प्रदूषित नद्या महाराष्ट्रात

    22-Mar-2024
Total Views |

world water day


मुंबई (विशेष प्रतिनिधी): देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या (Water pollution) या महाराष्ट्रात असल्याचा निकर्ष ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने (एमपीसीबी) मांडला आहे. मंडळाने ‘नॅशनल वॉटर क्वॉलिटी प्रोग्राम’अंतर्गत प्रकाशित केलेल्या अहवालामधून ही गंभीर बाब (Water pollution) समोर आली आहे.

यामध्ये जल प्रदूषणाची (Water pollution) पातळी धोकादायक असणार्‍या नद्यांमध्ये मिठी, मुठा, सावित्री या नद्यांचा समावेश असून तानसा, वैतरणा, अमरावती, वाशिष्ठी या कमी प्रदूषित नद्या (Water pollution) आहेत. ‘एमपीसीबी’कडून देशातील नद्यांमधील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी ‘नॅशनल वॉटर क्वॉलिटी प्रोग्राम’ राबविण्यात येत आहे.


धोकादायक प्रदूषित नद्या
मिठी, मुठा, सावित्री, भीमा

अत्याधिक प्रदूषित नद्या
गोदावरी, मुळा, पावना, कन्हान, मुळा-मुठा

मध्यम प्रदूषित नद्या
तापी, गिरणा, कुंडलिका, दरणा, इंद्रावती, नीरा, घोड, कृष्णा, रंगावली, पातळगंगा, सूर्या, तितूर, वाघुर, वर्धा, वैनगंगा, चंद्रभागा, मोरना, मुचकुंडी

कमी प्रदूषित नद्या
कोलार, तानसा, उल्हास, आंबा, वैतरणा, वाशिष्ठी, अमरावती, बोरी, गोमई, हिवरा, बिंदूसारा 

यामध्ये ‘एमपीसीबी’कडून देशातील नद्यांच्या पात्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे पाण्याचे नमुने गोळा केले जातात. फिजिओ कॅमिकल, मेटल्स आणि पेस्टीसाईड अशा काही मापदंडाच्या आधारावर नद्यांचे प्रदूषण ठरवले जाते. विशेषत: पाण्यातील प्राणवायूचे आवश्यक प्रमाण (बीओडी) गृहीत धरले जाते. या मापदंडाच्या तपासणीअंती नदी पात्रातील प्रदूषित (Water pollution) पट्टा निश्चित केला जातो. त्यानंतर प्रदूषित नद्यांच्या अहवाल प्रकाशित केला जातो. या नव्या अहवालानुसार, देशातील 28 राज्ये आणि सात केंद्र शासित प्रदेशातील 603 नद्यांपैकी 311 नद्यामधील काही पट्टे प्रदूषित आढळले आहेत. त्यानुसार देशात सर्वाधिक प्रदूषित नद्या या महाराष्ट्रात असून त्यांची संख्या 55 आहे. त्याखालोखाल मध्य प्रदेश (19), बिहार (18), केरळ (18), कर्नाटक (17) या राज्यांचा क्रमांक लागत आहे.




महाराष्ट्रात प्रदूषित (Water pollution) आढळलेल्या 55 नद्यांमधील पाण्याचे 147 नमुने घेण्यात आले होते. हे नमुने ‘बीओडी’ मानकांच्या तपासणीत प्रदूषित आढळले. महाराष्ट्रातील मिठी, मुळा, सावित्री आणि भीमा या नद्या सर्वाधिक प्रदूषित, (Water pollution) तर त्यानंतर क्रमाने गोदावरी, मुळा, पावना, कन्हान, मुळा-मुठा या नद्या प्रदूषित (Water pollution) आढळल्या आहेत. यामधील मिठी पात्रातील माहिमचा पट्टा, मुळा पात्रातील औंढगाव ते बोपोडी, सावित्रीच्या पात्रामधील महाडचा पट्टा, भीमा पात्रातील पुणे ते सोलापूरचा पट्टा सर्वाधिक प्रदूषित आढळला आहे. प्रदूषित नद्यांना स्वच्छ करण्यासाठी राज्य शासनाकडून कृती आरखडा तयार केला जातो. तसेच, नदी पुनर्जीवित समिती आणि केंद्रीय निरीक्षण समितीमार्फत प्रगतीवर लक्ष ठेवले जाते.