केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला चुकवावी लागेल : शरद पवार

22 Mar 2024 16:26:42
Sharad pawar on Arvind Kejriwal arrest

मुंबई
: कथित मद्यविक्री घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दि. २१ मार्च रोजी रात्री अटक करण्यात आली. ईडीने आपल्यावर अटकेसारखी कोणतीही कारवाई करणार नाही, असे लेखी हमी द्यावी, यासाठी केजरीवालांनी दिल्ली उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. पण ती याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली. आणि ईडीकडून केजरीवालांना अटक करण्यात आले. दरम्यान शरद पवार यांनी याप्रकरणावरून केंद्र सरकार आणि भाजपावर टीका केली आहे. केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला चुकवावी लागेल, असे ही पवार यावेळी म्हणाले.

दि. २२ मार्च रोजी पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी केजरीवालांच्या अटकेचा निषेध केला. तसेच मोदींच्या भुमिकेला विरोध केल्याने केजरीवालांना अटक करण्यात आल्याचे आरोप पवारांनी केले. दरम्यान भाजपला अरविंद केजरीवालांच्या अटकेची किमंत मोजावी लागेल, असा इशारा ही शरद पवारांनी दिला. दरम्यान केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचे ही पवार म्हणाले. तसेच आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलायं. जे पुर्णपणे चुकीचे आहे, असे विधान पवारांनी केले आहे. दुसरीकडे विरोधी पक्षाने केजरीवाल यांच्याविरोधात झालेल्या कारवाईचा निषेध केला आहे. आणि केजरीवालांना पाठिंबा दर्शवला आहे.



 
Powered By Sangraha 9.0