"अनेकदा काम मागितलं पण..." मनोज वाजपेयींनी आवडत्या मराठी दिग्दर्शकाबद्दल केले मोठे विधान

22 Mar 2024 18:22:54
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते पद्मश्री मनोज वाजपेयी पुन्हा एकदा नव्या अवतारात दिसणार आहेत.
 
 
manoj
 
मुंबई : प्रभावशाली अभिनय, भाषेवरील उत्तम पकड असणारे अभिनेते मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) सध्या चित्रपट, ओटीटी ही दोन्ही माध्यमं गाजवत आहेत. आजवर त्यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचा वेड लावले आहे. काही दिवसांपुर्वी एकीकडे त्यांच्या १०० व्या ‘भैयाजी’ चित्रपटाची (Manoj Bajpayee) घोषणा करण्यात आली तर दुसरीकडे बहुप्रतिक्षित ‘फॅमेली मॅन सीझन ३’ लवकरच येणार असल्याचे सांगितले. तर अशा या बहुआयामी अभिनेत्याला एका मराठी दिग्दर्शकासोबत काम करण्याची प्रचंड इच्छा आहे.
 
नुकत्याच झालेल्या Amazon Prime च्या कार्यक्रमात बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले की, “मी दिग्दर्शकांचा मोठा चाहता आहे. त्यातही किल्ला या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण यांच्या कामाची मला भूरळ पडली आहे. त्याच्यांसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. स्ट्रगल तर माझ्या नशीबातच होता. आजही मी मला जे हवंय त्यासाठी स्ट्रगल करतो. ज्या दिग्दर्शकासोबत काम करायचंय त्याच्याकडे काम मागतो."
 
अविनाश अरुण यांच्याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की, "मी अविनाश यांना पृथ्वी थिएटरमध्ये भेटलो होतो. तेव्हा त्यांच्याकडे काम मागितलं. नंतर आम्ही अंधेरीत भेटलो तेव्हाही काम मागितलं. इतकंच काय न्यूयॉर्कमधील फूटपाथवरही मी त्याच्याकडे काम मागितलं आहे. पण दरवेळी अविनाशकडून पाहुया सर, बोलूयात य असाच रिप्लाय येतो. आता तरी त्याने मला कन्फर्म सांगावं अशी माझी इच्छा आहे," असे म्हटले. त्यामुळे आता तरी मनोज वाजपेयींना अविनाश अरुण काम देणार का हे पाहावे लागेल.
Powered By Sangraha 9.0