काँग्रेसला धक्का, प्रदेश सचिवांचा भाजपमध्ये प्रवेश!

22 Mar 2024 16:07:46
Maharashtra Congress leader Dr Nitin Kodwate to join BJP

मुंबई
: गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते, प्रदेश काँग्रेसचे सचिव डॉ. नितीन कोडवते आणि त्यांच्या पत्नी डॉ.चंदा कोडवते यांनी दि. २२ मार्च रोजी भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला.भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खा.अशोक नेते, आ.बंटी भांगडिया, बाबुराव घोडे, मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे,भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते. कोडवते पती पत्नीच्या भाजपा प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटना वाढीसाठी मदत होईल असा विश्वास ही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
 
यावेळी बावनकुळे म्हणाले की, डॉ.कोडवते यांनी कोरोना काळात गडचिरोली जिल्ह्यातील वनवासी बांधवांची निस्वार्थ भावनेने सेवा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाला साथ देण्यासाठी डॉ.कोडवते दाम्पत्याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपामध्ये प्रवेश केलेल्या सर्वांच्या पाठीशी एक कुटुंब या नात्याने पक्ष संघटना खंबीरपणे उभी राहील. डॉ.कोडवते दांपत्याने कोणतीही अपेक्षा न ठेवता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या होत असलेल्या विकासाने प्रेरित होऊन भाजपामध्ये आलेल्या कोडवते पती पत्नीच्या नेतृत्वाला योग्य संधी, सन्मान दिला जाईल अशी ग्वाही बावनकुळे यांनी यावेळी दिली.

यावेळी कोडवते दांपत्य म्हणाले की, मोदी सरकारच्या विकास कार्याने प्रभावित होऊन आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या विकासाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवून गडचिरोली जिल्ह्याचा विकासासाठी हा निर्णय घेतला आहे. यापुढे भाजपासाठी निरपेक्ष भावनेने आम्ही काम करू, असे ही ते यावेळी म्हणाले. डॉ.चंदा कोडवते यांनी २०१९ मध्ये गडचिरोली विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवत ७० हजार मते मिळवली होती.

 
Powered By Sangraha 9.0