उद्धव ठाकरे सत्तेसाठी पिसाळलेला नेता - बावनकुळे

22 Mar 2024 18:22:16
Chandrasekhar Bawankule on Uddhav Thackeray

मुंबई
: "उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे", असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवार, दि. २२ मार्च रोजी केला.नरिमन पॉईंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत. त्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे. त्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरेंचे साथीदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात. महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही.

औरंगजेबी वृत्ती असलेल्या उद्धव यांनी स्वत:च्या भावाला सर्वप्रथम घराबाहेर काढले. त्यांनीच राज ठाकरे यांना दूर केले. सख्ख्या भावासारख्या देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबासारखी आहे. सत्तेसाठी पिसाळलेले उद्धव ठाकरे आता मोदींना औरंगजेब म्हणत आहेत. उद्धव ठाकरे २२ जानेवारीची तारीख विसरले का? आता ४ जून येऊ द्या, मग तुम्हाला दिसेल. २०२४ ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट निवडणूक असेल, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Powered By Sangraha 9.0