"इंडस्ट्रीत खरेपणा कमी उरलाय", असं का म्हणाली मधुरा वेलणकर?

21 Mar 2024 13:57:06
आदित्य इंगळे दिग्दर्शित आणि विवेक बेळे लिखित ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’ चित्रपट महाराष्ट्रभरात २९ मार्च रोजी प्रदर्शित होणार.
 

madhura velankar 
 
रसिका शिंदे-पॉल
 
मुंबई : अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री मधुरा वेलणकर (Madhura Velanakr) शलाका हे पात्र साकारणार आहे. चित्रपटाच्यानिमित्ताने ‘महाएमटीबी’शी मधुराने (Madhura Velankar) गप्पा मारताना खरेपणाबद्दल फार महत्वाचे विधान केले. इंडस्ट्रीत खरेपणा कमी उरला आहे असे म्हणत मला तो माझ्या परिने जपायचा आहे असे देखील ती म्हणाली.
 
चित्रपटातील सहकलाकारांकडून कोणती गोष्ट शिकावीशी वाटेल असे मधुरावा विचारले असता ती म्हणाली, “अभिनेते अतुल परचूरे यांच्याकडून खरेपणा शिकायला आवडेल. खुप कमी जणांमध्ये खरेपणा उरला आहे. या झगमगाटाच्या दुनियेत खरेपणा टिकवणं आणि त्यावर ठाम राहाणं गरजेचं आहे. अनेकदा आजूबाजूच्या परिस्थितीमुळे तुम्ही डळमळू शकता किंवा काही गोष्टी सोडू शकता. तर अशीच खरेपणा सोडलेली माणसं पाहिली आहेत. मात्र, अशात खरेपणा असलेल्या माणसांकडून बऱ्याच गोष्टी शिकाव्याशा वाटतात”.
 
दरम्यान, ‘अलीबाबा आणि चाळीशी’तले चोर’ हा चित्रपट २९ मार्च रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अतुल परचुरे, मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 
Powered By Sangraha 9.0