स्वामी समर्थांचा अपमान, मुजाहिद शेखवर एफआयआर दाखल!

21 Mar 2024 18:33:48
 Mujahid Sheikh

मुंबई
 : महाराष्ट्रातील नवघर पोलीस ठाण्यात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी मुजाहिद शेख नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. २० मार्च रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला. मुजाहिद शेख यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह शब्द उल्लेख केला.मुजाहिद शेख यांनी पंतप्रधानांचा अपमान करण्यासाठी हिंदूंचं दैवत श्रीस्वामी समर्थ यांचे चित्र संपादित करून त्यावर पंतप्रधान मोदींचा चेहरा लावलेला फोटो पोस्ट केला. ज्यात आक्षेपार्ह कॅप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप शेखवर करण्यात आला.

दरम्यान याप्रकरणी वसई विरार परिसरातील नवघर पोलिस ठाण्यात मुजाहिदविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १५३-A , 295 A, यासोबत IT कायदा २००० सह ६६ - C कलम देखील लावण्यात आले आहे. तसेच मुजाहिद शेखला पोलीसांना अटक ही करण्यात आली आहे.याप्रकरणी मीरा रोडच्या भाजप आमदार गीता जैन यांनी मुजाहिदवर कठोर कारवाई व्हावे यासाठी तक्रार दाखल केलीय. याप्रकरणी दै.मुंबई तरुण भारताला प्रतिक्रिया देताना गीता जैन म्हणाल्या की, आरोपी व्यक्तीकडून संतमहात्मांचा आणि पंतप्रधानांचा अपमान करण्यात आलेला असल्याने या दोन्ही गोष्टी अत्यंत निषेधार्ह आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कारण स्वामी समर्थांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यात आरोपी असे कृत्य वारंवार करत असल्याच्या तक्रारी आल्याने एफआयआर दाखल करावी लागली.मुळात मीरा रोड येथील तणावाचे वातावरण नुकतेच शांत झाले असून अल्पसंख्याक समाजातील व्यक्तीने असे कृत्य करणे अत्यंत गंभीर आहे , असे ही जैन म्हणाल्या.

दरम्यान गीता जैन यांनी वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना लिहलेल्या पत्रात म्हणटले आहे की, “आरोपीने चित्र संपादित करून श्रीस्वामी समर्थांचा अपमान केला आहे. स्वामी समर्थांची महाराष्ट्रातील हिंदू मोठ्या संख्येने पूजा करतात. शिवाय, मुजाहिदने केवळ हिंदू संतच नव्हे तर संपादीत चित्रातून पंतप्रधान मोदींचाही अपमान केला आहे.





Powered By Sangraha 9.0