इरफानने केले २ अल्पवयीन मुलींचे अपहरण; स्थानिक व्यापारी संघटनेने लावले ९१ दुकानांना टाळे

21 Mar 2024 12:34:07
 Uttarakhand
 
डेहराडून : उत्तराखंडमधील पिथौरागढमधील धारचुला शहरातील स्थानिक व्यापारी संघटनेने ९१ दुसऱ्या राज्यातून किंवा शहरातून आलेल्या दुकानदारांना शहर सोडण्यास सांगितले आहे. व्यापारी संघटनेने या दुकानदारांचे परवाने रद्द केले आहेत. फेब्रुवारी महिन्यात इरफान नावाच्या नाईने दोन स्थानिक अल्पवयीन मुलींचे अपहरण करून बरेली येथे नेल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.
 
पिथौरागढचे एसपी लोकेश्वर सिंह यांनी एका निवेदनात सांगितले होते की, इरफान नावाच्या व्यक्तीला धारचुलातून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. इरफान आणि त्याच्या एका साथीदाराने या दोन मुलींना धारचुला येथून बरेली येथे नेले आणि तेथे लग्नाचे आश्वासन दिले. ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली होती. इरफान आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध पोक्सो आणि कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  अल्पवयीन मुलीसोबत बलात्कार, व्हिडिओही शेयर केला; आरोपी 'वसीम' पोलिसांच्या ताब्यात
 
मोहम्मद इरफान या मुलींना आमिष दाखवत असे, अशी माहिती समोर आली आहे. इरफानने बरेलीहून धारचुलाला जाऊन नाईचे दुकान उघडले होते. चौकशीत त्याने या मुलींना बंगळुरूला घेऊन जायचे असल्याचे सांगितले होते. या मुलींचे दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी अपहरण करण्यात आले होते आणि दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांची सुटका करण्यात आली होती.
 
या प्रकारानंतर स्थानिक लोक संतप्त झाले आणि त्यांनी बाहेरील दुकानदारांची पडताळणी करण्यास सांगितले. यानंतर व्यापारी असोसिएशनने निर्णय घेत बाहेरून येणाऱ्या ९१ दुकानदारांची नोंदणी रद्द केली. त्यापैकी ८६ मुस्लिम आहेत. पण व्यापार संघटनेच्या या निर्णयावर इस्लामिक संघटनांनी आक्षेप घेतला. या घटनेनंतर संशयास्पद लोकांना घरे आणि दुकाने भाड्याने देऊ नका असे आवाहन नागरिकांना करण्यात आले.
 
हे वाचलंत का? -  "फक्त ४ लग्नासाठीच शरिया का? चोरांचे हात कापा, बलात्काऱ्याला..."; UCC चा विरोध करणाऱ्यांना शाहांनी सुनावले
 
धारचुलाची घटना ही पहिलीच घटना आहे असे नाही. याआधी २०२३ मध्ये उत्तराखंडमधील पुरोला येथे असाच एक प्रकार समोर आला होता. पुरोळा येथे दोन तरुणांनी एका मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, यानंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले असून त्यांनी बाहेरून आलेल्या अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
धारचुलामध्येच २०१९ मध्ये एका मुलीवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. त्यावेळी स्थानिक लोकांनी याप्रकरणी एका तरुणावर आरोप केला होता. हिंदू संघटनांनीही या प्रकरणाला लव्ह जिहाद म्हणत निषेध केला होता आणि कठोर कारवाईची मागणी केली होती.
 
त्याचप्रमाणे, काही दिवसांपूर्वी, नावेद मलिक नावाच्या तरुणाने अमनची भूमिका साकारून हल्द्वानीच्या मुखानी पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. यानंतर त्याने तिला आपल्या घरी बोलावून दारू पाजून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तो मुलीवर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकत होता. नावेदच्या आधीच विवाहित पत्नीचाही या घटनेत सहभाग होता, असा आरोप करण्यात आला.
 
 
 
Powered By Sangraha 9.0