काँग्रेसकडून महाराष्ट्रातील ७ उमेदवारांची घोषणा!

21 Mar 2024 21:45:52
Congress

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने गुरुवार, दि. २१ मार्च रोजी ५७ उमेदवारांची घोषणा केली. त्यात महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश आहे.नंदुरबारमधून गोवल पाडवी, अमरावती बळवंत वानखेडे, सोलापूर - प्रणिती शिंदे, पुणे रवींद्र धंगेकर, कोल्हापूर शाहू महाराज छत्रपती, नांदेड वसंतराव चव्हाण आणि लातूरमधून शिवाजीराव काळगे यांना संधी देण्यात आली आहे.भाजपने याआधी जाहीर केलेल्या यादीनुसार, नंदुरबारमध्ये हिना गावित विरुद्ध गोवल पाडवी, पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर, नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर, तर लातूरमध्ये सुधाकर शृंगारे विरुद्ध शिवाजीराव काळगे असा सामना रंगणार आहे.

Powered By Sangraha 9.0