मुंबई: युएस फेडरल रिझर्व्ह व्याज दरात कपात न केल्याने आशियाई बाजारातील गुंतवणूकीत त्याचा सकारात्मक परिणाम दिसला आहे. विशेषतः सोन्याच्या भावात देखील नवी उभारी सराफा बाजारात नोंदवली गेली आहे.सकाळच्या सत्रात सोनाच्या भावात प्रति १० ग्रॅम किंमतीत १०२८ रुपयाने वाढ झाली आहे.
गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, भारतातील बाजारात प्रति ग्रॅम सोने किंमत ही ६१८० रूपयांच्या घरात गेली आहे. मुंबईत सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या किंमतीत मोठा फेरबदल झाला आहे. २२ कॅरेट सोन्याच्या भावात १००० रूपयांनी भाववाढ झाली आहे. तर २४ कॅरेट सोन्याच्या भावात प्रति ग्रॅमवर १०९० रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत १० ग्रॅम सोने किंमत २२ कॅरेटसाठी ६१८०० तर २४ कॅरेटसाठी १० ग्रॅमची किंमत ६६३३० रूपये आहे.
दिल्ली, अहमदाबाद आणि इतर शहरांसारख्या प्रमुख भौतिक सराफाबाजारात सोन्याची किंमत ६६००० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर १ किलो चांदीची किंमत ७६५०० रुपये आहे.चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. प्रति ग्रॅम चांदीत ७८.५० रुपयाने (१.५० टक्के) वाढ झाली आहे.मुंबईत १ किलो चांदी ७८५००० रूपयांनी विकली जात आहे.