"आपण गाईचे मांस खाऊ शकतो,..." जी डी गोएंका शाळेत मुलांना हिंदूविरोधी ज्ञान

    20-Mar-2024
Total Views |
gd-goenka-school-in-gandhidham-mislead
 

 
गांधीनगर :      ‘ही गाय आहे आणि आपण गाईचे मांस खाऊ शकतो’, अशी हिंदूविरोधी शिकवणूक जी डी गोएंका शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आले. हिंदूंच्या विरोधानंतर सदर प्रकरणी जी डी गोएंका शाळेकडून माफी मागण्यात आली आहे. शाळेतील अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना ही एक गाय आहे, काळी आणि पांढरी रंगांची गाय असते, तिला आपण खाऊ शकतो अशाप्रकारचे शिक्षण मुलांना दिले जात होते.


हे वाचलंत का? -  "रोहिंग्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही"; मोदी सरकारची सुप्रीम कोर्टात स्पष्ट भूमिका

 
दरम्यान, जी डी गोएंका शाळेतील विद्यार्थ्यांना गायीचे यथोचित वर्णन करतानाच आम्हाला तिचे दूध प्यायला आवडते, तसेच आम्ही तिचे मांस खाऊ शकतो अशी हिंदूविरोधी शिकवणूक विद्यार्थ्यांना दिली जात होती. हा अनुचित प्रकार निदर्शनास आल्यानंतर हिंदूंनी यास तीव्र विरोध दर्शविला. तसेच, हिंदूंच्या संतापानंतर जी डी गोएंका शाळेकडून माफी मागण्यात आली आहे.




दरम्यान, गुजरात कच्छमधील गांधीधाम येथील जीडी गोएंका इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षणाच्या नावाखाली मुलांना हिंदुविरोधी ज्ञान दिले जात होते. शाळेने दिलेल्या अभ्यासक्रमात गाईबद्दल प्रसिद्ध केलेल्या माहितीत गाईचे मांस खावे असे सांगण्यात येत होते. हिंदू संघटनांना ही बाब कळताच त्यांनी विरोध करत सदर प्रकरणी शाळेला माफी मागायला लावली. सोशल मीडियावर नेटिझन्सही शाळेच्या या कृतीवर टीका करत आहेत.

शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तक चित्रात असे लिहिण्यात आले आहे की, “ही गाय आहे. काळा आणि गोरा. तो Mooo म्हणतो. गवत खातो. आम्हाला त्याचे दूध प्यायला खूप आवडते. त्याचे मांस आपण खाऊ शकतो. त्याच्या डोक्यावर दोन शिंगे आहेत आणि त्याला शेतात राहायला आवडते.”