होळीकरिता वायकॉम गॅजेट्सचे साऊंडबार्स

20 Mar 2024 17:19:07

Soundbar
 
मुंबई: होळीचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी वायकॉम गॅजेट्सने आपले नवीनतम साऊंडबार्स 'बेसिकबार' सादर केले आहेत. हे साऊंडबार्स तुमचा ऑडिओ अनुभव सर्वोत्तम करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहेत. ब्रँड वायकॉम गॅजेट्सचे नवीनतम उत्पादन तुमच्या सणासुदीच्या आणि दैनंदिन मनोरंजनादरम्यान संगीताचा आनंद घेण्याच्या मार्गात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे.
 
ब्रँड १० मीटर वायरलेस रेंजसह क्रिस्टल-क्लियर ट्यून आणि शक्तिशाली बास ऑफर करतो. सण अखंडपणे साजरा करण्याच्या सुनिश्चिततेसह ६०% व्हॉल्यूमवर ६ तासांपर्यंत खेळण्याचा आनंद घेता येईल. ब्लूटूथ आवृत्ती ५.३ कोणत्याही व्यत्ययाशिवाय उच्च दर्जाच्या ऑडिओ स्ट्रीमिंगसाठी अखंड कनेक्टिव्हिटी प्रदान करते. १० डब्ल्यू आउटपुट पॉवरसह, पारंपारिक होळीच्या ट्यूनपासून समकालीन बीट्सपर्यंत परिपूर्ण आवाजाचा आनंद याद्वारे घेता येईल.
 
तुम्ही ढोलाच्या तालावर नाचत असाल किंवा मूडला साजेशा शांततेत उत्सव साजरा करत असाल बेसिकबारची १२०० एमएएच बॅटरी पार्टीचा मूड कायम ठेवते. वायाकॉम गॅजेट्स साउंड बार्सची किंमत मात्र रु. १२९९/- रुपये असून ते अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
 
Powered By Sangraha 9.0