देशाच्या डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये 'इतक्या' टक्क्यांची भरघोस वाढ

20 Mar 2024 14:11:39

Direct Tax
 
मुंबई: देशाच्या डायरेक्ट (प्रत्यक्ष)कर संग्रहणात (कलेक्शनमध्ये) १९.८८ टक्क्याने वाढ झाली असल्याचे आयकर विभागाने (Income Tax Department) ने सांगितले आहे. देशाच्या एकूण कर संग्रहण (कलेक्शन) १९.८८ टक्क्याने वाढत १८.९० लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.मागील वर्षीच्या तुलनेत सरकारने अंदाजापैकी यंदा ९७ टक्के कर संग्रहण लक्ष पूर्ण केले आहे.
 
कॉर्पोरेशन करातदेखील वाढ झाली आहे. कॉर्पोरेशन कर संग्रहण ९.१४ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचले आहे.व्यक्तिगत आयकर (Personal Income Tax) मध्ये सिक्युरिटी ट्रांझकशन टॅक्स (STT) समावेत कर संग्रहण ९.७२ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचले आहे. थेट कर संग्रहण १८९०२५९ कोटी रुपयांपर्यंत झाले आहे.
 
आर्थिक वर्ष २२-२३ तुलनेत २३-२४ मध्ये २२ टक्क्याने कर संग्रहणात वाढ झाली आहे.या व्यतिरिक्त ३.३७ लाख कोटींची रक्कम ही परतावा म्हणून देण्यात आली आहे.
 
तरतूद आकडेवारीनुसार, प्रत्यक्ष कराचे उत्पन्न १८९०२५९ कोटींपर्यंत वाढले असून मागील २२-२३ या आर्थिक वर्षाच्या १५७६७७६ कोटींपर्यंत वाढले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कर संग्रहणात १९.८८ टक्क्यांची वाढ झाल्याचे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
 
Powered By Sangraha 9.0