रामेश्वरम कॅफे स्फोटप्रकरणी चार जणांची चौकशी

02 Mar 2024 17:59:43
rameswaram cafe blast case
 
नवी दिल्ली: बंगळुरूच्या व्हाईटफिल्ड भागातील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणादेखील (एनआयए) याप्रकरणाचा तपास करत आहे.

बंगळुरू शहराचे पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी सांगितले की, शुक्रवारी झालेल्या आयईडी स्फोटाचा तपास वेगाने सुरू आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीवर पोलिसांची विविध पथके काम करत आहेत. स्फोटाची माहिती मिळताच राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) पथक घटनास्थळी पोहोचले. एनआयएही या स्फोटाच्या तपासात व्यस्त आहे. याच पथकाने धारवाड, हुबळी आणि बंगळुरू येथून चार जणांना चौकशीसाठी अटक केली आहे.

या घटनेनंतर राज्यभरात विशेषत: केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. बेंगळुरू पोलिसांनी कॅफे बॉम्बस्फोटाच्या संदर्भात कठोर बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा आणि स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.




Powered By Sangraha 9.0