“मुस्लिमांना ४ लग्न करण्याचा हक्क, हिंदु पण.. UCC बदद्ल जावेद अख्तर यांचे मोठे विधान

19 Mar 2024 14:20:45
UCC बद्दल जावेद अख्तर यांनी केले मोठे विधान
 

javed akhtar 
 
मुंबई : राजकीय, सामाजिक किंवा अन्य कोणत्याही विषयांवर जावेद अख्तर (UCC) आपली मते मांडून कायमच चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी समान नागरी कायदा (Uniform Civil Code) माझा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी (UCC) मुस्लिम बहुविवाह मुद्द्यावर भाष्य केले असून सध्या त्यांची UCC बद्दलची विधाने चर्चेत आहेत.
 
Uniform Civil Code बद्दलचे आपले स्वमत मांडत जावेद अख्तर म्हणाले, “फक्त मुस्लिमांवर टीका करण्यासाठी काही नियम लागू करणे अयोग्य आहे. चर्चा करुन काही नियम समान रुपाने सर्वांसाठी लागू करण्यात यायला हवेत. मी स्वतः समान नागरी कायद्याचे पालन करतो. परंतु, मुस्लिमांना बहुविवाह करता येऊ नये म्हणून समान नागरी कायद्याला पाठिंबा देत असेल तर हे चुकीचे आहे”, असे जावेद अख्तर म्हणाले आहेत.
 
पुढे ते म्हणाले की, “मुस्लिमांना चार लग्न करण्याचा अधिकार आहे म्हणून इतर लोकं जळतात. कायदा लागू करण्यासाठी हेच एक कारण आहे का? जर तुम्हालाही हा हक्क दिला तर काही अडचणी येणार नाहीत असे विधान करत त्यांनी हिंदू व्यक्ती आणि त्यांच्या लग्नावर मोठे विधान केले.
 
“बेकायदेशीररित्या हिंदू देखील बहुविवाह करतात. हिंदूंमध्ये दोन लग्न अधिक आहे असे सांगितले जाते. प्रत्येकासाठी कायदा हा समानच असायला हवा. मी माझ्या मुलाला आणि मुलीला समान अधिकार दिले आहेत.’ असे देखील जावेद अख्तर यावेळी म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे आता पुढे काय परिणाम होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0