“‘शक्तिमान’ चित्रपट कोणत्याही स्टारमुळे चालणार नाही”, रणवीरला मुकेश खन्ना यांनी सुनावले खडे बोल

19 Mar 2024 14:49:51
रणवीर सिंगने भारत देश सोडून जावं, ‘शक्तिमान’ चित्रपटावरुन मुकेश खन्ना भ़डकले
 

shaktiman 
 
मुंबई : ९०च्या दशकात जन्माला आलेल्या प्रत्येक लहान मुलाचा सुपरहिरो म्हणजे 'शक्तिमान' (Shaktiman). १९९७ ते २००५ या कालावधीत ही मालिका टीव्हीवर तुफान गाजली. अभिनेते मुकेश खन्ना यांनी या मालिकेत ‘शक्तिमान’ (Shaktiman) ची भूमिका साकारली होती. या लोकप्रिय मालिकेवर आता चित्रपट येणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. साहजिकच या ‘शक्तिमान’च्या भूमिकेतील कलाकाराच्या नावाची देखील चर्चा सुरु झाली असून अभिनेता रणवीर सिंग ही भूमिका करणार असे म्हटले जात आहे. यावर मुकेश खन्ना (Shaktiman) यांनी सणसणीत उत्तर दिले आहे.
 
'शक्तिमान' फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंग भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी रणवीर सिंग ‘शक्तिमान’च्या भूमिकेत नसला पाहिजे असे म्हणत तीव्र विरोधी केला आहे. खन्ना म्हणाले की, “रणवीर सिंगची स्टार पॉवर असूनही तो कधीही ‘शक्तिमान’ची भूमिका करू शकत नाही”. पुढे त्यांनी त्यांनी रणवीरच्या न्यूड फोटोशूटला बालिशपणा म्हणत 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी त्याची चुकीची निवड असल्याचे म्हटले आहे.
 
इतकेच नव्हे तर खन्ना यांनी रणवीरला भारत सोडून दुसऱ्या देशात राहण्याचा सल्ला देत म्हटले की त्याने न्युडिस्ट कॅम्प असेलल्या फिनलँड आणि स्पेनसारख्या देशात राहावे. या शहरांमध्ये त्याला आरामात आमि मुक्तपणे राहता येईल. तसेच, रणवीरने अशा चित्रपटांमध्ये काम करावं, जिथे प्रत्येक तिसऱ्या सीनमध्ये असे न्यूड सीन करण्याची संधी मिळेल, अशा तिखट शब्दांत त्यांनी रणवीरला सुनावले आहे.
 
पुढे खन्ना म्हणाले की, “शरीर दाखवून तुम्ही स्मार्ट व्हाल असं जर का तुम्हाला वाटत असेल तर मी तसं होऊ देणार नाही. मी शक्तिमान चित्रपटाच्या निर्मात्यांशी बोललो आहे. तुमची स्पर्धा स्पायडर मॅन, बॅटमॅन किंवा कॅप्टन प्लॅनेटशी नाही. 'शक्तिमान' हा केवळ एक सुपरहिरो नाही, तर एक शिक्षकदेखील आहे. त्यामुळे कोणताही अभिनेता जो 'शक्तिमान' बनतो त्याच्यात काहीतरी असलंच पाहिजे.. तो जे काही बोलेल ते लोकांनी ऐकावं. त्यामुळे माझ्या मते शक्तीमान चित्रपट चालला तर तो केवळ कंटेंटवरच चालेल; एखाद्या सुपरस्टारमुळे नाही”. त्यामुळे आता ‘शक्तिमान’च्या भूमिकेत कोण दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार असा दावा केला जात आहे, की निर्मात्यांनी 'शक्तीदुसमान' चित्रपटासाठी रणवीर सिंगची निवड केली आहे. इतकंच नाही तर २०२५ पासून चित्रपटाचं शूटिंग सुरू होऊ शकतं. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.
Powered By Sangraha 9.0