बिहारमध्ये रालोआच्या जागावाटपावर मोहोर!

18 Mar 2024 18:53:53
RJD-Congress Seat Sharing Formula Finalized
 
नवी दिल्ली: भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (रालोआ) बिहारमधील ४० लोकसभा मतदारसंघांच्या जागावाटपावर सोमवारी मोहोर लागली आहे. बिहारमध्ये भाजप, जदयु, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास), हिंदुस्तान आवाम मोर्चा (हम) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा हे पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी पत्रकारपरिषदेत बिहारमध्ये जागावाटप ठरल्याचे जाहिर केले. भाजप मुख्यालयात झालेल्या या पत्रकारपरिषदेत बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह सहकारी पक्षांचे नेते उपस्थित होते. भाजपप्रणित रालोआ निवडणुकीत निर्भेळ यश मिळवेल, असा विश्वास विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.

बिहारमध्ये लोकसभेचे ४० मतदारसंघ आहेत. त्यापैकी भाजप १७ तर मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष १६ जागा लढवणार आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) या पक्षाला ५ जागा देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चा आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा यांना प्रत्येकी १ जागा देण्यात आली आहे.दरम्यान, या जागावाटपामध्ये रालोआ घटकपक्ष असलेल्या पशुपतीकुमार पारस यांच्या लोकजनशक्ती पक्षास एकही जागा देण्यात आलेली नाही.





Powered By Sangraha 9.0