"राऊत हा घ्या पुरावा!" 'फ्युचर गेमिंग'वरुन भाजपने राऊतांना झापले!

18 Mar 2024 11:51:25

Sanjay Raut


मुंबई :
फ्युचर गेमिंगवरुन भाजपने उबाठा गटाचे नेते संजय राऊतांना चांगलेच झापले आहे. संजय राऊतांनी फ्युचर गेमिंग कंपनीने भाजपला देणगी दिल्याचा आरोप केला होता. यावर आता भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी इंडी आघाडीतील एका पक्षाची पोलखोल करत राऊतांवर निशाणा साधला.
 
संजय राऊतांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरी जुगार खेळाची माहिती दिल्याचे सांगितले होते. तसेच या ऑनलाईन लॉटरी जुगार अड्ड्यावर अनेक तरुण मुले उध्वस्त होत असून या जुगारात अनेक कुटूंब नष्ट झाली. पोलिस आणि मंत्रालयात मोठे हप्ते मिळत असल्याने या जुगारास सरकारी पाठबळ आहे. यावर कारवाईची मागणी केली. पण फडणवीस कारवाई कशी करतील? या जुगारी कंपनीने (future gaming.. Martin lottery agency Ltd.) 450 कोटी भाजपला देणगी दिली आहे," असा आरोप त्यांनी केला होता.

 
यावर आता प्रविण दरेकरांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, "फ्यूचर गेमिंगने सर्वाधिक ३७ टक्के म्हणजे ५०९ कोटी रुपये तुमच्या इंडी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या द्रमुकला दिले आहेत. हे स्वतः द्रमुकने सुद्धा जाहीर केले. तुम्ही नाही कुणाचे तर किमान राजदीप सरदेसाई यांचे तर ट्विट एकदा वाचून घेतले असते. पण अर्थात दर महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट देणाऱ्यांना ते कसे दिसेल?" असा टोलाही त्यांनी लगावला आहे.



Powered By Sangraha 9.0